रामकृष्ण नगर बगीचा आणि मैदानाची प्रचंड दुर्दशा

03 Oct 2023 17:36:02
नागपूर,
 
worst-gardens-nagpur रामकृष्णनगर व टेलीकॉम नगर बगीचाशेजारच्या मैदानावर प्रचंड झाडे-झुडुपे वाढली आहेत. worst-gardens-nagpur परिसरातील नागरिकांनी आमदार व नगर पालिकेच्या मागे लागून हे उद्यान करवून घेतले. जेव्हा उद्यान तयार केले तेव्हा मैदानाचा अर्धा भाग रिकामा सोडला होता. त्या रिकाम्या जागेवर पहिले समाज भवन होणार होते. worst-gardens-nagpur पण ते झाले नाही. मग प्ले ग्राऊंड होणार होते. पण ते सुद्धा झाले नाही. worst-gardens-nagpur नंतर तेथे जॉगिंग पार्क करणार होते. तो पण झाला नाही. शेवटी कचरा टाकायची व मोकाट गुरे बसायची ती जागा झाली आहे. मैदानावर गवत वाढले आहे. त्यामुळे रोगराई पसरायची भीती वाढली आहे.
 
 
 
worst-gardens-nagpur
 
 
मागे ऐकले होते की सर्व रिकाम्या मैदानांचा महानगर पालिका स्वत: विकास करणार आहे. तो केव्हा करणार आहे ?बगीच्यामधे मुलांकरिता जी खेळणी लावली आहेत ती सुध्दा तुटली आहेत. worst-gardens-nagpur रात्री लाईट नसतो. अंधार असतो. झाडांची कटाई होत नाही. हा अतिशय दुर्लक्षित बगीचा झाला आहे. बाकीचे बगीचे व्यवस्थित आहेत. देवेन्द्र फडणवीस यांचा मतदारसंघ असुनसुद्धा ही स्थिती आहे. स्वच्छतेच्या बाबतीत तेच हाल आहेत. worst-gardens-nagpur पावसाळ्यात तर अतिशय चिखल असतो. वयस्क व लहान मुले यांना पडायची भीती वाटते. नाही म्हणायला दुर्गादेवी बसते तेव्हा संपूर्ण मैदान साफ होते.
 
सौजन्य : राजेंद्र वाडी, संपर्क मित्र
Powered By Sangraha 9.0