भुतांची उपराजधानीत एंट्री !

halloween party-nagpur कॉसप्ले, पॉप कल्चरचा माहौल

    दिनांक :31-Oct-2023
Total Views |
नागपूर,
 
halloween party-nagpur गुलाबी थंडीत वातावरणाचा पूर्ण आनंद घेण्यासाठी यंदा भुत, प्रेत, स्पायडर मॅन सारखे हिरो आणि नरुटो, टोबी सारखी ॲनिमेटेड पात्रे उपराजधानीत अवतरली. या अनोख्या कॅरेक्टरर्सची वेशभूषा, आगळे-वेगळे खेळ तरुणांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरत होते. निमित्त होते हॅलोविन २०२३चे ! halloween party-nagpur पॉपशुगर आणि नोसोलो यांच्या संयुक्त विद्यमाने हॅलोविन पार्टीचे आयोजन उपराजधानीत शनिवारी आणि रविवारी उत्तर अंबाझरी मार्गावरील अमृत भवन येथे करण्यात आले. या सेलिब्रेशनमध्ये भुत, राक्षस, पिशाच्च यांनी सहभाग नोंदविला होता. halloween party-nagpur कार्यक्रमात कॉसप्ले, नृत्य स्पर्धा, के-पॉप म्युझिक, रॅपिंग आणि मनोरंजनासाठी बँडचे, ट्रेजर हंट आणि ब्लाईंड फोल्ड सारख्या खेळांचेही आयोजन करण्यात आले होते.
 
 
 
halloween party-nagpur
 
 
यावेळी, रंगीबेरंगी, चित्र-विचित्र, विविध आधुनिक शस्त्रधारी आणि विशिष्ट वेशभूषा धारण केलेले ॲनिमेटेड कॅरेक्टर्स, बीटीएस (आर्मी) आणि आकर्षक कोरियन वेशभूषा केलेले सुमारे ५० हून अधिक तरुण बघायला मिळाले. halloween party-nagpur विशेष म्हणजे, ॲनिमेटेड कॅरेक्टरबाबत शहरातील तरुणांमध्ये वाढणाऱ्या आकर्षणाची ग्वाही कार्यक्रमात तरुणांची गर्दी देत होती. प्रत्येकजण या कॅरेक्टर्सला आपल्या मोबाईल फोनच्या कॅमेरात टिपण्याचा प्रयत्न करीत होता. halloween party-nagpur भारतीय संस्कृती आणि परंपरेमध्ये जसा पितृपक्ष पाळून पितरांचे स्मरण केले जाते; त्याच प्रमाणे हॅलोविन ही देखील पाश्चात्य संस्कृतीमधील एक प्रथा आहे. यावर्षी, देखील हॅलोविनमध्ये कॉसप्ले हा प्रकार तरुणांद्वारे करण्यात आला.
 
 
कॉसप्ले हे ‘कॉस्ट्युम’ आणि ‘रोलप्ले’ याचे संक्षिप्त रुप आहे. जपानी भाषेत याला 'कोसुपुरे' म्हणून संबोधले जाते. जपानमधील प्रसिद्ध मांगा सिरीज किंवा ॲनिमेटेड कॅरेक्टर्स यामध्ये साकारले जातात. halloween party-nagpur यावेळी, टोबी, नरुटो, उझुमाकी, लुफी, हटके ककाशी, मिडोरिया इजुकू, मिडोरिया इजुकू, मिको, घोस्ट प्रेडिएटर, पेरुना, सोगे किंग, बुग्गीमैन, लिओना, रुएक, ब्रुक, फिमेल स्पायडरमॅन या कॅरेक्टर्सची विशेष क्रेझ बघायला मिळाली. halloween party-nagpur ॲनिमेटेड कॅरेक्टर्सचे आधुनिक स्वरुपाचे शस्त्र देखील लोकांना आश्चर्यचकित करणारे होते. तरुणांसह विविध गटातील लोक यांच्यासह सेल्फी काढण्याचा मोह आवरू शकले नाही.
 
सौजन्य : निखिल कोळेकर, संपर्क मित्र