डोणगाव,
Tantamukti Samiti : गाव पातळीवरील छोट्या कारणावरून निर्माण होणार्या तंट्याचे पर्यावसान मोठ्या संख्येत होऊ नये म्हणून लोकसहभागातून राबविण्यात येणार्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेच्या अध्यक्ष पदाच्या निवडी करता बुलढाणा जिल्ह्याच्या राजकीय पटलावर प्रभावी असणार्या शेलगाव देशमुख ग्रामपंचायत च्या वतीने 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी जयंती निमित्त ग्रामसभेचे आयोजन केले होते.
ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती Tantamukti Samiti अध्यक्ष यांची निवड करणे या विषयावर ग्रामसभेचे आयोजन सरपंच किरण दिलीप आखरे. ग्रामविकास अधिकारी डीपी काळे यांनी केले होते ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती समितीच्या अध्यक्ष पदाकरिता अनेक इच्छुक असल्याने ग्रामसभेमध्ये कुठलाही वाद-विवाद होऊ नये या दृष्टिकोनातून तंटामुक्ती समिती अध्यक्ष ची निवड शांततेत पार पडावी म्हणून आज दिनांक 2 ऑक्टोबर रोजी ग्रामसभेमध्ये तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड ही गुप्त मतदान पद्धतीने व्हावी नागरिकातून मागणी करण्यात आली होती.
त्या मागणीनुसार Tantamukti Samiti तंटामुक्ती अध्यक्ष पदाची निवड मतदान पद्धतीने घेण्याकरिता ग्रामसभेचा ठराव पारित करण्यात आला आणि दि. 28 नोव्हेंबर रोजी तंटामुक्ती अध्यक्ष ची निवड पार पडणार असूनआज रोजी तंटामुक्त समितीच्या अध्यक्ष पदाकरता अनेकांनी गुडघ्याला बाशिंग बांधले असून अनेक उमेदवार रिंगणात असून दिनांक 20 नोव्हेंबर रोजी अर्ज मागे घेणे. 22 नोव्हेंबर रोजी चिन्ह वितरण करणे दिनांक 28 नोव्हेंबर रोजी गावकर्याचे तर मतदान पद्धतीने मतदान त्यानंतर निकाल घोषित होणार आहे असा ठराव ग्रामसभेत सर्वानुमते पारित केला असून त्यांच्या तंटामुक्ती अध्यक्ष पदाच्या निवडी करता उमेदवारांना आपल्या प्रयत्नाची परा कष्ट करावी लागणार आहे हे विशेष.