तभा वृत्तसेवा
वर्धा,
Ankita murder case सेलू तालुक्यातील दहेगाव (गोसावी) येथील अंकिता बाईलबोडे हिच्या घरी जाऊन चौघांनी तिचा खून केला. याप्रकरणी 2 रोजी रात्री उशिरा चौघांना अटक करण्यात आली होती. दरम्यान, आज 4 रोजी या प्रकरणात गुंतलेल्या पाचव्या आरोपीला वर्धेतून अटक करण्यात आली आहे. लकी अनिल जगताप असे या आरोपीचे नाव आहे.

दहेगाव (गोसावी) येथील अंकिता बाईलबोडे हिचा गांधी जयंतीच्या दिवशी रात्री 8 वाजता तिच्या घरी जाऊन गळ्यावर चाकूने वार करीत खून केला. खून करून पळत असताना गावकर्यांनी पाठलाग करीत ज्ञानेश्वर खोब्रागडे (24) रा. इतवारा, अर्जुन इटकर (20) महिला आश्रम, प्राप्ती जगताप (24) रा. नालवाडी व आंचल शेंडे (21) रा. गोरक्षण वार्ड सर्व रा. वर्धा यांना अटक करण्यात आली. Ankita murder case हा खून प्रेम प्रकरणातून झाल्याचे निष्पन्न झाले. चार आरोपींपैकी प्राप्ती जगताप हिच्या पतीसोबत मृतक अंकिताचे प्रेमसंबंध असल्यानेच हा खून झाला. त्यामुळे या प्रकरणात पाच जणांना आरोपी करण्यात आले होते. खून होताच पाचवा लकी जगताप हा फरार होता. त्याला आज बुधवारी सायंकाळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केल्याची माहिती स्थानिक गुुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संजय गायकवाड यांनी सांंगितले.