मुलीनों, अन्याय होत असल्यास पोलिसांशी संपर्क साधा

05 Oct 2023 20:21:01
गोंदिया, 
Damini Pathak : महिला, मुलींसोबत अन्याय, अत्याचार वा फसवणूक घटना होत असल्यास तातडीने पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा पोलिसाच्या भरोसा सेल व दामिनी पथकाच्या वतीने करण्यात आले. तालुक्यातील डव्वा/पळसगाव येथील जीईएस विद्यालय व कला कनिष्ठ महाविद्यालयात 4 ऑक्टोबर रोजी जिल्हा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे व पोलिस उपअधीक्षक नंदिनी चानपूरकर यांच्या मार्गदर्शनात आयोजीत मुलींच्या सुरक्षेसंदर्भात आयोजित जनजागृती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना पोलिस अधिकार्‍यांनी आवाहन केले.
 
Damini Pathak
 
कार्यशाळेत पोलिस निरीक्षक Damini Pathak योगिता चाफले, पोउपनि पूजा जाधव, पोहवा तिरपुडे, चेतना पारधी, पोशि रमेंद्र बावनकर, वैशाली भांदक्कर, पुनम मंजुटे, नेहा पाचे यांनी भरोसा सेल व दामीनी पथकासह समाजात महिला व मुलींसोबत होणारी छेडछाड, बालकावर होणारे लैंगीक अत्याचार, बाल विवाह कायदा, सायबर फ्रॉड याबाबत जनजागृतीपर मार्गदर्शन केले. तसेच अशा प्रकारच्या घटना त्याचे सोबत घडल्यास त्याबाबत पोलिसांशी त्वरीत संपर्क आवाहन केले. प्रसंगी दामिनी पथक महिला आणि मुलींकरिता कशा पध्दतीने कामकाज करते याबाबत मार्गदर्शन करून मुलींना आत्मसुरक्षेचे धडे दिले.
Powered By Sangraha 9.0