- अॅड. प्रसन्न मालेकर यांचे देवी महात्म्यावर निरुपण
- आदिशक्तीची अष्टमी ग्रंथ प्रकाशन सोहळा
यवतमाळ,
श्री बापू सहस्रबुद्धे स्मृतिप्रीत्यर्थ नवरात्रातील अष्टमीवर आधारित Adishakti Granth Publication आदिशक्तीची अष्टमी या ग्रंथाचे प्रकाशन कशाळकर सभागृहात उत्साहात पार पडले. चैतन्य सहस्रबुद्धे लिखित या ग्रंथाचे प्रकाशन अॅड. प्रसन्न मालेकर यांनी केले. यावेळी मंचावर कार्यक‘माचे अध्यक्ष बळवंत सहस्रबुद्धे उपस्थित होते. मालेकर यांनी या ग्रंथाची उपयुक्तता विषद करून करवीर निवासिनी महालक्ष्मी हा विषय मांडताना कोल्हापूर महालक्ष्मीचे मंदिर स्थापत्य, देवीची मूर्ती, तिचा इतिहास, तेथील उपासना, दिनक्रम, देवीची पूजा त्यातील उद्देश हे सारे त्यांनी निरुपणात मांडले.
देवीची उपासना ही शक्तीची उपासना असून कोणतेही कार्य शक्तीशिवाय पूर्ण होत नाही. म्हणून जगदंबेची उपासना जीवनात शाश्वत समाधान मिळवून देते. या जगाचा आधारच ती Adishakti Granth Publication आदिशक्ती होय. जेथे शक्ती तिथे शिव आहेच. शक्ती अपरिमित झाली तर ती अनियंत्रित होईल म्हणून शिवाचे स्थान तिच्या जवळ असतेच. शिवशक्ती नियंत्रित करतो. एकूणच देवीची उपासना ही मानवी जीवनाला भुक्ती आणि मुक्ती दोन्हीही प्रदान करणारी आहे, असे मालेकर आपल्या निरुपणात म्हणाले.
अध्यक्षीय भाषणात बळवंत सहस्रबुद्धे यांनी नवरात्रातील अष्टमीचे महत्व विषद करून Adishakti Granth Publication ग्रंथाविषयी शुभेच्छा दिल्या. तर ग्रंथाचे लेखक चैतन्य सहस्रबुद्धे यांनी ग्रंथ लेखन प्रवास आपल्या मनोगतात उलगडला. कार्यक‘माचे सूत्रसंचालन चंद्रशेखर मुळे यांनी केले. ‘आदिशक्ती’ हा ग्रंथ महाराष्ट्रभर वितरीत केल्या जाणार असून या सोहळ्यास यवतमाळातील भाविकांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. कार्यक‘मासाठी शंतनू मुळे, वैभव जिरापुरे, सुनील सावजी, हृषीकेश तांदळे व आनंदवन परिवार यांनी परिश्रम घेतले.