छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा आयोजन

06 Oct 2023 18:29:16
मानोरा, 
Chhatrapati Shivaji Maharaj बजरंगदल विदर्भ प्रांताच्या वतीने या महिन्याच्या दोन तारखेपासून श्री छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा अकोला महानगर येथून सुरू झाली असून मानोरा शहरामध्ये सोमवारी यात्रेचे स्वागत करण्यात येणार आहे. तत्पश्चात तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे सायंकाळी जाहीर सभा आणि शौर्य जागरण यात्रेचा मान्यवर व बजरंग दलाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये समारोप होणार आहे.
 
 
Chhatrapati Shivaji Maharaj
 
बजरंग दल हिंदुत्वासाठी प्राचीन काळापासून संघर्षरत आहे. धर्म आणि राष्ट्रावर आलेल्या संकटकाळाप्रसंगी सगळ्यात आधी अग्रभागी बजरंग दल उपस्थित असते. अयोध्येमधील वादग्रस्त मशीद उठविणे असो, राम सेतु वाचविणे असो,गोमातेची रक्षण करणे असो, हिंदू मुली आणि महिलांना लव्ह जिहादच्या षडयंत्रातून वाचविणे असो अथवा हिंदू धर्मातील नवयुवकांना संस्कारी बनविणे असो यासाठी बजरंग दला द्वारा हिंदुस्थानामध्ये शौर्य जागरण यात्रेची आयोजन करण्यात आलेले आहे. Chhatrapati Shivaji Maharaj या यात्रेचा हेतू हिंदू समाजामध्ये शौर्य जागरण करणे व हिंदू समाजामधील सुप्त शक्तीला जागृत करून हिंदू समाजाला संघटित व शक्तिशाली बनविणे आहे. हिंदू धर्मातील सगळ्यांना बजरंग दलाकडून या यात्रेला यशस्वी करण्यासाठी धर्म आणि राष्ट्रीयत्वाच्या या यज्ञात वेळेची आहुती देऊन सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अकोला येथून निघालेली ही छत्रपती शिवाजी महाराज शौर्य जागरण यात्रा पिंजर, मुर्तीजापुर, आकोट, बाळापुर, पातुर, मालेगाव, वाशीम,मंगरूळनाथ आणि कारंजा ह्या शहरां मार्गे ९ ऑक्टोबर रोजी मानोरा शहरात दाखल होणार आहे. तीर्थक्षेत्र पोहरादेवी येथे सायंकाळी पाच वाजता जाहीर सभा होणार असून या समारोप सभेचे मा.शंकरजी गायकर (वि.हिं.प. केंद्रीय सहमंत्री) अ.भा.गोरक्षा विभाग हे प्रमुख वक्ते राहणार आहेत
Powered By Sangraha 9.0