जलजीवन मिशन योजनेतून शिरपूरची पाणी समस्या कायमची सुटेल

06 Oct 2023 20:30:32
चिखली, 
Jaljeevan Mission Yojana मतदारसंघातील जनतेला रस्ते, वीज, पाणी आदी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच या भागाचा सर्वतोपरी विकास करण्याचा संकल्प केला असून त्याच्या पूर्ततेसाठी विविध शासकीय योजनांचा लाभ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवण्याचे अभियान आपण हाती घेतले आहे. जलजीवन मिशनच्या कामाचा शुभारंभ शिरपूरची पाणी समस्या कायमची सुटेल असा विश्वास आ. श्वेता महाले यांनी व्यक्त केला. दि. 1 ऑक्टोबर रोजी आयोजित 18 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण करताना त्या बोलत होत्या.
 
 
Jaljeevan Mission Yojana
 
Jaljeevan Mission Yojana या प्रसंगी जिल्हा सरचिटणीस भाजप देवीदास जाधव, उपजिल्हा प्रमुख शिवसेना शिवाजीराव देशमुख, बुलढाणा तालुका अध्यक्ष भाजप अ‍ॅड सुनील देशमुख, जिल्हा अध्यक्ष विधी सेल अ‍ॅड. मोहन पवार, तालुकाध्यक्ष युवा मोर्चा योगेश राजपूत, बुलढाणा तालुका उपाध्यक्ष भाजप सुरेश चौधरी, जिल्हा कार्यकारणी सदस्य सुनील पोफळे, बुलढाणा पंचायत समिती सदस्य संदिप उगले, सरपंच येळगाव दादाराव लवकर, सरपंच पांगरी नागेश उबरहडे, नामू गुरूदासाणी, बुलढाणा तालुका सरचिटणीस सतीश पाटील , विक्रम सोनूने, भगवान शेळके, दिनकर शेळके, नारायण सुसर, अंकुश सुसर, ज्ञानेश्वर सुसर, बाळाभाऊ शेळके, भागवत सुसर, मधुकर पवार, अरुण शेळके, दिगाबर शेळके, तेजराव शेळके, राहुल शेळके, दत्तात्रय हिवाळे यांच्यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सरपंच लक्ष्मी जनार्दन सुसर, उपसरपंच मीना मधुकर पवार तथा भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रीपाइं आठवले गट, रासप, शिवसंग्राम, प्रहार तसेच मित्रपक्ष महायुतीचे पदाधिकारी व ग्रामपंचायत, ग्रामसेवा सहकारी सोसायटी, तंटामुक्ती समिती, कार्यकर्ते, समस्त सदस्य ग्रामपंचायत व गावकरी मंडळी यांनी पुढाकार घेतला.
Powered By Sangraha 9.0