हमासच्या हल्ल्यामागे चीनची चिथावणी

    दिनांक :07-Oct-2023
Total Views |
- कर्नल अभय पटवर्धन यांनी व्यक्त केली शक्यता

नागपूर, 
नुकत्याच भारतात झालेल्या जी-20 शिखर परिषदेच्या वेळी चीनला काटशह देण्यासाठी आयएमईसीची (इंडिया मिडलईस्ट युरोपियन युनियन कॉरिडॉर) स्थापना करण्यात आली. यात भारतासह मध्य पूर्वेतील देश आणि युरोपियन युनियनचा समावेश आहे. इस्रायलनेही या कॉरिडॉरला समर्थन देताना करारावर स्वाक्षरी केली आहे. चीन-पाकिस्तानच्या आर्थिक कॉरिडॉरला प्रत्युत्तर देण्यासाठी हा आयएमईसीचा कॉरिडॉर तयार केला जाणार आहे. या प्रकारामुळे अस्वस्थ असलेल्या चीनने हमासला चिथावणी देऊन इस्रायलवर हल्ला चढविला असल्याची शक्यता संरक्षण तज्ज्ञ Colonel Abhay Patwardhan कर्नल अभय पटवर्धन (निवृत्त) यांनी व्यक्त केली आहे.
 
 
Abhay-Balkrishna-Patwardhan
 
युद्धांचा अनुभव, गनिमी काव्याने बंडखोरांचा केलेला नायनाट याचा अनुभव असलेले Colonel Abhay Patwardhan कर्नल पटवर्धन इस्रायल-पॅलेस्टाईन युद्धावर तरुण भारतशी बोलत होते. ते म्हणाले की, या नव्या कॉरिडॉरच्या निर्माणामुळे चीनप्रमाणेच पाकिस्तान आणि काही मुस्लिम देशांचा तिळपापड झालेला आहे. त्यातूनच हा हल्ला केला गेला असावा, अशी शक्यता आहे. विशेष म्हणजे, प्रत्युत्तर देताना इस्रायलनेही गाझापट्टीमधील महत्त्वाच्या ठिकाणांवर 150 लढाऊ विमानांच्या सहायाने हल्ले केले असल्याची माहिती आहे. 1973 सालीही इस्रायल-पॅलेस्टाईन यांच्यात युद्ध भडकले होते. त्यानंतरचा हा सर्वात मोठा हल्ला आहे. गेल्या दहा वर्षांपासून तशीही दोन्हीकडे खदखद सुरू आहे. याआधी गाझापट्टीच्या काही भागांमधून इस्रायलवर हल्ले केले जायचे. यावेळी मात्र, संपूर्ण गाझापट्टीमधून एकत्रितपणे हे हल्ले करण्यात आले आहे. याशिवाय आकाश व जमीन या दोन्ही मार्गांनी हे हल्ले करण्यात आले आहेत. याआधी करण्यात आले नव्हते असे ड्रोनद्वारेही हल्ले हमासकडून करण्यात आले आहेत.
 
 
 
इस्रायलवर हवाई मार्गाने सुमारे आठ हजार रॉकेट्स डागण्यात आले असून हमासच्या सुमारे 150 शस्त्रसज्ज अतिरेक्यांनी इस्रायलच्या गाझापट्टीकडील भागात घुसखोरी करून इस्रायलचे सुमारे 70 टँक उद्ध्वस्त केले असल्याची माझी माहिती आहे, असे सांगून कर्नल पटवर्धन म्हणाले की, या युद्धामुळे इराणची खाडी आणि सुवेझ कालवा मार्गाने होणारी समुद्री वाहतूक बंद होण्याची शक्यता आहे. शिवाय सौदी अरब आणि कतार येथून भारताला होणारा अनुक‘मे तेल आणि गॅसचा पुरवठा प्रभावित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे 1973 साली ज्याप्रमाणे भारतात इंधनाचे दर पाच पटींनी वाढले होते तसेच यावेळीही होण्याची शक्यता आहे. थोडक्यात म्हणजे या युद्धामुळे भारतीयांना महागाईची झळ सोसावी लागू शकते. आयएमईसीसाठी इस्रायलने भारताची साथ देऊन करारावर स्वाक्षरी केल्यामुळे आता भारतानेही या युद्धात इस्रायलला समर्थन जाहीर केले आहे. चीन आणि पाकिस्तानच्या कारवाया रोखायला म्हणूनच अमेरिकेने पुढाकार घेत हा कॉरिडॉर सुरू करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सार्‍या प्रकारामुळेच चीन अस्वस्थ झालेला आहे. त्यामुळेच त्याने हमासला चिथावणी देऊन हे हल्ले घडवून आणले असावे, अशी शक्यता मला वाटत असल्याचेही Colonel Abhay Patwardhan कर्नल पटवर्धन म्हणाले.