करंजेकर फार्मसी महाविद्यालयाला नॅक चमूची भेट

    दिनांक :07-Oct-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
साकोली, 
Karanjekar College of Pharmacy वैनगंगा बहुद्देशीय विकास संस्था द्वारा संचालित बाजीरावजी करंजेकर कॉलेज ऑफ फार्मसी ला नुकतीच नॅक चमूने भेट दिली. यात दिल्ली, चेन्नई आणि आंध्रप्रदेश या राज्यातील सदस्यांचा समावेश होता. 3 आणि 4 ऑक्टोबर अशा दोन दिवशीय दौèयात सदर चमूने महाविद्यालयाचे संपूर्ण अवलोकन केले. महाविद्यालयाची उत्तरोत्तर होत असलेली प्रगती आणि महाविद्यालयातील शैक्षणिक सुव्यवस्था बघून चमूने समाधान व्यक्त केले.
 
 
Karanjekar College of Pharmacy
 
या चमूमध्ये डॉ. एस.ए. अंसारी एक्स व्हाईस चॅन्सलर जामिया हमदर्द यूनिव्हरसिटी न्यू दिल्ली, डॉ. पलानी शामसुंदरम डायरेक्टर स्कूल ऑफ फार्मासूटीकल सायन्स व्हेल्स इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स टेक्नालॉजी अ‍ॅण्ड स्टडीज पी.व्ही. विद्यालयीगाम चेन्नई, डॉ. अब्दुल रहमान प्रिन्सिपल निर्मला कॉलेज ऑफ फार्मसी आत्माकूर मंगलगिरी आदींचा समावेश होता. Karanjekar College of Pharmacy  यावेळी महाविद्यालयाची सर्व सुव्यवस्था संस्थापक अध्यक्ष डॉ. ब्रम्हानंद करंजेकर, डॉ. सोमदत्त करंजेकर यांच्या मार्गदर्शनात प्राचार्य डॉ.पी.एस. रघु आणि समस्त प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पार पाडली.