फक्त एका ट्विटमुळे कोट्यधीश झाला कंगाल

-18 हजार कोटींच्या कंपनीचे मूल्य 74 रुपये!

    दिनांक :08-Oct-2023
Total Views |
दुबई, 
B. R. Shetty : भारतीय वंशाचे उद्योगपती बी. आर. शेट्टी यांचे नाव एकेकाळी कोट्यधीश उद्योगपतींच्या यादीत समाविष्ट होते. मात्र, एका ट्विटने त्यांचे नशीब बदलले. ते एकूण 18 हजार कोटी रुपयांचा म्हणजेच सुमारे 3.15 अब्ज डॉलर्सचे मालक होते. त्यांच्याकडे दुबईत अनेक व्हिला, रोल्स रॉयस आणि मेबॅकसार‘या आलिशान कार आणि खाजगी जेट होते. पण, बदलत्या काळानुसार बी. आर. शेट्टींच्या 18 हजार कोटी रुपयांच्या कंपनीचे मूल्य केवळ 74 रुपये झाले. गेल्या दशकात दिवाळखोरीत निघालेल्या कंपनीचे हे अतिशय गुंतागुंतीचे प्रकरण आहे.
 
B. R. Shetty
 
बावगुथू रघुराम शेट्टी (B. R. Shetty) कामाच्या नवीन संधी शोधण्यासाठी केवळ आठ डॉलर्स घेऊन आखाती देशात पोहोचले होते. रात्रंदिवस मेहनत करून त्यांनी यूएईमध्ये एनएमसी हेल्थ नावाची सर्वांत मोठी आरोग्य कंपनी स्थापन केली होती. काही वर्षांतच त्यांचे नाव दुबईसह जगातील श्रीमंतांच्या यादीत आले. शेट्टी यांनी बुर्ज खलिफात दोन मजले 25 दशलक्ष डॉलर्समध्ये खरेदी केले होते. शेट्टी हे भव्य पार्ट्यांसाठीही ओळखले जात होते.
 
2019 मध्ये नशीब बदलले
2019 मध्ये यूके स्थित कंपनी मडी वॉटर्सच्या एका ट्विटने (B. R. Shetty) बी. आर. शेट्टीची कंपनी दिवाळखोरीत निघाली. मडी वॉटर हे कार्सन ब्लॉक नावाच्या शॉर्ट सेलरद्वारे चालवले जात होते. या ट्विटनंतर या शॉर्ट सेलर कंपनीने बी. आर. शेट्टी यांच्या कंपनीचा अहवाल प्रसिद्ध कंपनीवर एक अब्ज डॉलर्सचे कर्ज लपवल्याचा गंभीर आरोप करण्यात आला होता. हा अहवाल आल्यानंतर एनएमसी आरोग्याची स्थिती इतकी वाईट झाली की 18 हजार कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली इस्रायल आणि यूएईस्थित कंपनी अवघ्या 1 डॉलरला विकली गेली.