भाजपा कामगार मोर्चा प्रदेश सरचिटणीस पदी मिलिंद देशपांडे

    दिनांक :08-Oct-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
वर्धा, 
Milind Deshpande भारतीय जनता पार्टी कामगार मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस पदी कामगार नेते मिलिंद देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 6 रोजी प्रदेश कार्यालयात कामगार मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष विजय हरगुडे यांच्या अध्यक्षतेखाली व कामगार मोर्चाचे माजी प्रदेश अध्यक्ष गणेश ताठे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.
 
 
Milind Deshpande
 
मिलिंद देशपांडे हे भाजपा जिल्हा उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. कामगार क्षेत्राचा प्रदीर्घ अनुभव असलेले मिलिंद देशपांडे विदर्भातील अनेक मोठ्या कारखान्यांच्या कामगारांचे नेतृत्व करीत आहेत. महाराष्ट्र राज्य नवनिर्मित नर्सेस संघटनेचे ते अध्यक्ष आहेत. विदर्भातील 35 ते 40 हजार कामगार त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत आहेत. विधीशास्त्रातील पारंगत मिलिंद देशपांडे विविध सामाजिक संस्थांचे पदाधिकारी आहेत. महाराष्ट्रात प्रथमच काढलेली कंत्राटी कामगारांची सहकारी पत संस्था त्यांच्या मार्गदर्शनात यशस्वी मार्गक्रमण करीत आहे. नियुक्तीबाबत त्यांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, विदर्भ प्रदेश संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर, खासदार रामदास तडस, जिल्हाध्यक्ष सुनील गफाट यांचे आभार मानले. त्यांच्या नियक्तीचे सर्वस्तरावर स्वागत होत असून, संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांना न्याय मिळेल, असा विश्‍वास व्यक्त केल्या जात आहे.