मतदार जनजागृती रांगोळी स्पर्धा

    दिनांक :08-Oct-2023
Total Views |
सानगडी, 
Voter Awareness महाराष्ट शासनाच्या वतीने राबविण्यात येणा-या स्वीप अभियानांतर्गत मतदान जनजागृती रांगोळी स्पर्धेचे आयोजन स्व.निर्धन पाटील वाघाये महाविद्यालय सानगडी येथे प्राचार्य डॉ.प्रकाश सिंग, नोडल अधिकारी प्रा. स्मिता टेंभुर्णे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. डॉ. वंदना चवरे यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.
 
 
Voter Awareness
 
यावेळी विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून मतदारांना जागृत करणा-या रांगोळ्या काढल्या. Voter Awareness स्पर्धेत दामिनी गिरी हिचा प्रथम क्रमांक तर हेमलता कोहळे द्वितीय व सीमा नेवारे हिने तृतीय क्रमांक प्राप्त केला. स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता राष्ट्रीय सेवा योजना प्रमुख प्रा. डॉ. राजेश भेंडारकर प्रा. दीपा भिवगडे प्रा. धवनकुमार करेले. प्रा. श्रीरंग लभाने प्रा. प्रज्ञाशील मेश्राम यांनी सहकार्य केले.‌