उमरखेड वार्तापत्र
- विजय आडे
उमरखेड,
Umarkhed city : उमरखेड शहर हे औदुंबर या पौराणिक नावाने व साधुसंतांची भूमी म्हणून प्रसिद्ध आहे. शहराच्या चारही बाजूला साधु-फकीरांच्या समाधी आहेत. उमरखेड शहर हे फकिरों की बस्ती म्हणून सुपरिचित आहे. श्री आईंनाथ महाराज, श्री साधु महाराज, कवडाशा बाबा, घोंगडा पीर, श्री चिन्मयमूर्ती संस्थान मठ यांचे अनेक मठाधिपती असा धार्मिक वसा लाभलेले औदुंबर वृक्ष सर्वत्र वेढलेले असल्यामुळे हे गाव ‘औदुंबर क्षेत्र’ या नावाने अगोदरच्या काळात सुप्रसिद्ध होते.
अशा या पावन गावाचे आज शहरात रूपांतर झाले. पण 1982 च्या काळात गणेश विसर्जन मिरवणुकीत दगडफेक करून दंगल झाली. चार दिवस गणेश विसर्जन झाले नव्हते आणि या शहराला जो कलंक लागला तो आजतागायत तसाच आहे. शासन दप्तरी लाल अक्षरात जी नोंद झाली संवेदनशील शहर म्हणून ती दरवर्षी कुठलाही सण आला की जाणवते. अधिकचे पोलिस दल गावात येऊन ठाण मांडते. कुठलाही पोलिस अधिकारी, Umarkhed city प्रशासनिक अधिकारी येथे आला की त्याला सण-उत्सवांच्या काळात सामाजिक शांतता अबाधित ठेवण्याची परीक्षा दयावी लागते.
पूर्वीच्या काळी महाराष्ट्रात सर्व सण उत्सव मोठ्या उत्साहाने साजरे व्हायचे. पण जसजशी राजकीय स्पर्धा व हेवेदावे वाढायला लागले तशी सामाजिक दुफळी व्हायला लागली. Umarkhed city राजकीय स्पर्धेत समाजा-समाजांमध्ये तेढ निर्माण करण्याचे कारस्थान करण्याचे काम होत गेले. वर्षभर जे व्यवसाय, धंदा, कारभार एकमेकांच्या सहाय्याने करतात ते सण उत्सव आले की परकोटींचा द्वेष असल्यासारखे का वागतात हे आश्चर्यजनक कोडे आहे. राजकीय स्पर्धेपायी आजकाल गावोगावी जे सामाजिक कलुषता निर्माण करण्याचे काम सुरू आहे ते चिंताजनक आहे. या वर्षी 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशी व ईद ए मिलाद हा एकाच दिवशी आले होते. शांतता समितीच्या बैठकीत मुस्लिम संघटनांनी चांगला निर्णय घेऊन त्या दिवशी छोटी मिरवणूक व 1 ऑक्टोबरला मोठी मिरवणूक काढण्याचे ठरवले होते. त्याप्रमाणे गणेश विसर्जन मोठ्या उल्हासात व शांततेत पार पडले होते.
नंतर तीन दिवसात असे काय घडले कुणास ठाऊक, कुठे माशी शिंकली हे कळण्यास मार्ग नाही. 1 ऑक्टोबरला जी ईदची मिरवणूक निघाली त्यासाठी अनेक गावातून लोक आणल्या गेले. Umarkhed city जास्तीचे डीजे आणण्यात आले. या बाहेरून आलेल्या व गावातील काही विघ्नसंतोषी लोकांनी शिवाजी वार्डात अश्लाघ्य कृत्ये केली. अर्धनग्न अवस्थेत नृत्य करणे, अश्लील हावभाव, रस्त्यात लघवी करणे, दारावर थुंकणे, वादग‘स्त घोषणा देणे हा प्रकार केला गेला. छत्रपती शिवाजी महाराज चौकात राजमुद्रा व महाराजांच्या प्रतिमेवर आनि तेथील कॉम्प्लेक्सवर लेझर लाईटने मशिदीचे फोटो दाखविणे, वादग‘स्त घोषणा देणे, उशिरा मिरवणूक काढून उशिरा संपविणे, असले प्रकार करण्यात आले. त्यामुळे शहरातील वातावरण तणावात होते. पोलिस प्रशासनाची मोठीच कसरत झाली.
वारंवार Umarkhed city शहरात अशांतता माजविण्याचे असले प्रकार कोण घडवून आणत आहे याचा पोलिस प्रशासनाने कसून शोध घ्यावा. जेणेकरून शहरात पुन्हा असले प्रकार व घटना घडू नये. पोलिस प्रशासनाने त्यांच्या पोलिस डायरीमध्ये नोंद असलेल्या खर्या गुन्हेगारांवर कडक कारवाई करावी आणि या उमरखेड शहराला संवेदनशील शहरांच्या यादीतून बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करावे. तसेच समाजाच्या तथाकथित ठेकेदारांनीही त्यांच्या राजकारणापायी संपूर्ण गावाचे सामाजिक स्वास्थ बिघडवू नये, ही सर्वसामान्य जनतेची अपेक्षा..