निर्दयतेने गोवंशाची अवैध वाहतूक

पोलिसांची कारवाई ६ गोवंशांची सुटका

    दिनांक :09-Oct-2023
Total Views |
वाशीम,
cattle with cruelty निदर्यतेने गोवंशाची अवैध वाहतूक प्रकरणी पोलिसांनी बोलेरो चारचाकी वाहनावर कारवाई करुन ६ गोवंशाची सुटका करुन आरोपीवर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये कारवाई करण्यात आली.याबाबत सविस्तर असे की, प्राण्यांवरील अत्याचार संदर्भात शासनाने निर्गमित केलेल्या अधिनियमांन्वये वाशीम जिल्ह्यात महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम, १९७६ अन्वये क्रूरपणे होणार्‍या जनावरांच्या वाहतूक व बेकायदेशीर कत्तली, बेकायदेशीर गोवंश मांस बाळगणे किंवा प्राण्यांना क्रूरतेने वागविण्याबाबत आरोपींवर पोलिस दलातर्फे वेळोवेळी कारवाई केली जाते.
 
 
cattle with cruelty
 
त्याच पार्श्वभूमीवर ७ ऑटोबर रोजी सायंकाळी कामरगाव येथील काही युवकांना शिवन वरून एक पांढर्‍या रंगाची बोलेरो पिकअप गाडी पाठीमागून लाकडी पाट्या लावलेल्या अवस्थेत भरधाव वेगाने येतांना दिसली. त्यांना सदर गाडीतून गोवंशांची कत्तलीकरिता अवैधरीत्या वाहतुकीचा संशय आल्याने त्या गाडीचा पाठलाग करून गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला असता ती गाडी बाबापूर बेंबडा शिवाडीच्या रस्त्याने काही अंतरावर जाऊन थांबली. cattle with cruelty त्या गाडीतील ३ इसम हे बोलेरो गाडी जागीच सोडून पळून गेले. सदर गाडीची तपासणी केली असता त्यामध्ये अवघडलेल्या अवस्थेत निर्दयतेने बांधलेल्या अवस्थेत ६ बैल व एका पन्नीमध्ये जनावराचे कापलेले मांस मिळून आले. त्यामुळे सदर बोलेरो वाहन क्र. एमएच ३० बीडी ५१३१ पंचासमक्ष जप्त करून सदर आरोपींवर पो.स्टे.धनज येथे महाराष्ट्र पशु संवर्धन अधिनियम १९७६ व ११ प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम, १९६० अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून १.५० लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई सुरु आहे.