‘शासन आपल्या दारी’त 207 जणांना मिळाली नोकरी

01 Nov 2023 15:57:13
तभा वृत्तसवेा
यवतमाळ, 
Sasan Apna Dari शहराजवळील किन्ही येथे नुकताच ‘शासन आपल्या दारी’ उपक‘माचा कार्यक्रम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून शासनाच्या योजनांची माहिती आणि त्यांचा लाभ नागरिकांना देणे हाच उद्देश होता. तसेच रोजगाराच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी शासन आपल्या दारीचा कार्यक्रम नवीन उमेद घेवून आला. या शासन आपल्या दारी कार्यक‘मात 207 जणांना नोकरी देण्यात आली. त्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्रही देण्यात आले.
 
 
Sasan Apna Dari
 
या कार्यक्रमात कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत पंडित दीनदयाल उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या महारोजगार मेळाव्यात 264 युवक युवतींनी नोंदणी केली होती. त्यापैकी 207 जणांची नामांकित कंपन्यांमध्ये प्राथमिक निवड करण्यात आली. या मेळाव्यात पेटीएम, हिमालया कार्स, वैभव एम्टरप्रायझेस, मेगाफिड बायोटेक या नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. Sasan Apna Dari या कंपन्यांतील एकूण 1 हजार 504 जागांसाठी उमेदवारांच्या मुलाखती घेवून पात्र ठरणार्‍यांची निवड करण्यात आली. त्यामुळे शासन आपल्या दारी कार्यक‘म बेरोजगारांनाही संधी देणारा उपक्र म म्हणून नावारुपाला आला.
 
राज्यात नाही म्हटले तरी बेरोजगारीचा प्रश्न आहेच. राज्य शासन भरती प्रकि‘याही राबवित आहे. मात्र, स्पर्धा परीक्षार्थींची सं‘या मोठी असल्याने आपली निवड होईल की नाही, या मनस्थितीत युवक खाजगी किंवा कंत्राटी नोकरीच्या शोधात असतात. अशातच राज्य शासनाचा शासन आपल्या दारी उपक्रमात रोजगार मेळावे आयोजित करुन बेरोजगारांना नोकरीची संधी उपलब्ध करुन दिली आहे. त्याचा फायदा देखील युवकांना झाला आहे. त्याची प्रचिती यवतमाळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या पंडित दीनदयाल महारोजगार मेळाव्यातून दिसून आली. शासन आपल्या दारी कार्यक‘मात आयोजित महारोजगार मेळाव्यात 264 उमेदवारांना नोंदणी केली होती. त्यापैकी 207 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली. यातील अर्जून आनंद राठोड आणि पंकज ज्ञानेश्वर जाधव या दोन उमेदवारांना नामांकित कंपनीमध्ये नौकरी मिळाली. त्यांना मु‘यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते नियुक्ती प्रमाणपत्र देण्यात आल्याने उपक‘माची उंची वाढली आहे.
Powered By Sangraha 9.0