मनोज जरांगे पाटील समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साखळी उपोषण

    दिनांक :01-Nov-2023
Total Views |
बुलढाणा,
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यभरात चांगलाच गाजतोय जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसलेले आहेत. या आंदोलनाला सकल मराठा समाज बांधवाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दि. 1 नोव्हेंबर रोजी साखळी उपोषणाला प्रारंभ केला आहे. जिल्ह्यात या आंदोलनाला पाठिंबा मिळत आहे.
 
Manoj Jarange Patil
 
बुलढाणा येथील आंदोलनात मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने विविध पक्ष संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने पाठिंबा देण्यासाठी सहभागी झाले होेते. शिवसेना उबाठा गटाचे जिल्हाप्रमुख जालिंधर बुधवत, काँग्रेसचे संजय राठोड, बुलढाणा वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. विजय सावळे, सुनील सपकाळ, जयसिंग राजे देशमुख, डॉ. शोन चिंचोले, पी. एम. जाधव, अनुजा सावळे, अ‍ॅड. जयंत जोशी, अ‍ॅड. नंदकिशोर साखरे यासह सर्व उपस्थित होते.
 
 
जिल्ह्यात, चिखली, सिंदखेडराजा येथे मराठा समाजबांधव उपोषणाला बसलेले आहेत. सिंदखेड राजा तालुक्यातील राहेरी, ताडशिवणी गावात पुढार्‍यांना गावबंदी करण्यात आलेली आहे. दरम्यान बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सकल मराठा समाजाच्या बांधवांनी उपोषणाला सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून उपोषणाला सुरुवात झाली. चिखलीत देखील सकल (Manoj Jarange Patil) मराठा समाजाचे कार्यकर्ते एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत.