अग्रलेख
deaths-road-accidents रस्ते अपघातात भारतात प्रत्येक तासाला १९ जणांचा मृत्यू, अपघातातील मृत्यूंमध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक, २०२२ मध्ये एकूण मृत्यूंमध्ये १८ ते ४५ वयोगटातील तरुणांची संख्या ६६.५ टक्के, deaths-road-accidents मृत्यूंमध्ये १८ ते ६० वयोगटातील ८३.४ टक्के नागरिकांचा समावेश, एकूण दुर्घटनांमध्ये दुचाकी अपघातांच्या घटना ४४.४ टक्के, ११.५ टक्के अपघात कार, जीप आणि टॅक्सीचे, सर्वाधिक ६४ हजार अपघात तामिळनाडूत तर त्या खालोखाल ५४ हजार ४३२ अपघात मध्यप्रदेशात, सर्वाधिक अपघाती मृत्यू उत्तरप्रदेशात (२२,५९५) आणि त्या खालोखाल मृत्यू तामिळनाडूत (१७,८८४), वेगमर्यादेच्या उल्लंघनामुळे ७१.२ टक्के मृत्यू तर राँग साईडमुळे झालेली मृत्युसंख्या ५.४ टक्के. deaths-road-accidents देशातील अपघातांचे विश्लेषण करणारी ही नवी आकडेवारी रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने दिली आहे. या माहितीनुसार देशात २०२२ मध्ये झालेल्या ४ लाख ६१ हजार ३१२ रस्ते अपघातांत पावणेदोन लाख नागरिकांचा मृत्यू झाला तर त्याच्या दुप्पट नागरिक अपघातात जखमी झाले. deaths-road-accidents
पूर्वी एखाद्या लढाईत किंवा साथीच्या रोगात अशी मृत्युसंख्या कानावर पडत असे. २०२० मध्ये जगभरात आलेल्या कोरोनाच्या साथीने असेच प्रचंड मृत्यू झाले होते. deaths-road-accidents पण त्या संख्येला लाजवणारी रस्ते अपघातातील मृत्यूंची संख्या असून त्यामुळे सरकारसह प्रशासन, नागरिक आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थांची चिंता वाढली आहे. भारतात २०२१ सालच्या तुलनेत २०२२ मध्ये अपघातांच्या संख्येत ११.९ टक्क्यांनी, बळींच्या संख्येत ९.४ टक्क्यांनी तर जखमींच्या संख्येत १५.४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. deaths-road-accidents रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाचा हा वार्षिक अहवाल आशिया पॅसिफिक रोड अपघातांतर्गत युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक अॅण्ड सोशल कमिशन फॉर आशिया अॅण्ड पॅसिफिकद्वारे तयार केलेल्या कॅलेंडर वर्षाच्या आधारावर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांच्या पोलिस विभागांकडून प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे तयार करण्यात आला आहे.
रस्ते अपघातांची संख्या कमी व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न होतात. सरकार तर वेळोवेळी रस्ते दुरुस्ती, दर्जा सुधार, रस्त्यांवर सूचना फलक लावणे, वाहतूक सिग्नल्स लावणे, अपघातप्रवण स्थळांचा शोध घेणे, अपघातांच्या दृष्टीने ब्लॅक स्पॉटची निवडून योग्य उपाययोजना करणे, स्पीड ब्रेकर्सची उभारणी, नागरिकांमध्ये जनजागृती, शाळा-महाविद्यालयांमध्ये कार्यशाळा, चालकांना विविध प्रकारांचे प्रशिक्षण, व्हिडीओंद्वारे जागृती केली जाते. deaths-road-accidents पण देशात वाढलेली अपघातांची संख्या आणि मृत्यूंकडे एकवार नजर टाकली तरी सरकारचे हे प्रयत्न पुरेसे नसल्याचे स्पष्ट होते. यावर आळा घालण्यासाठी कंबर कसण्याची गरज आहे. देशात वाहनांचीही संख्या निश्चितच वाढली आहे, त्यामुळे अपघातही वाढले आहेत, हे सांगितले जाऊ शकते. पण असे सांगणे म्हणजे सरकारच्या अपयशावर पांघरूण टाकण्यासारखे आहे. deaths-road-accidents बहुतांशी अपघात मानवी चुकांमुळे होतात, ही बाब मान्यच करायला हवी.
वाहनांचा वेग जास्त ठेवणे, बेदरकारपणे गाड्या चालविणे, सीट बेल्टचा वापर न करणे, संरक्षक भिंतींवर आदळणे, दारू पिऊन वाहन चालविणे, अशिक्षित वाहनचालक, पुरेशी झोप न घेता वाहने चालविणे, रस्त्यांवरील खड्डे, गुळगुळीत रस्ते आदी अपघातांची प्रमुख कारणे आहेत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार जगात १.३ अब्जाहून अधिक मृत्यू आणि ५० दशलक्ष गंभीर जखमींसह रस्ते अपघात हे मृत्यूचे आठवे प्रमुख कारण आहे. deaths-road-accidents ५ ते २९ वर्षे वयोगटातील मुले-तरुणांमध्ये मृत्यूचे हेच प्रमुख कारण आहे तर रस्त्यांवरील मृत्यूंमध्ये भारत पहिल्या क्रमांकावर आहे (जगात ११ टक्के वाटा). धीम्या वाहनांपेक्षा वेगवान वाहनांना अपघात होण्याची अधिक शक्यता असते आणि वेगवान वाहनांच्या बाबतीत अपघाताची तीव्रताही अधिक असते. वेग जितका जास्त तितका धोका अधिक. रस्ते वाहतूक मृत्यू आणि दुखापतींपैकी बहुसंख्य (९० टक्क्यांपेक्षा जास्त) कमी उत्पन्न आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये होतात. deaths-road-accidents नॉर्वेने अधिकृतपणे जगातील वाहन चालविण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाणाचा दर्जा मिळविला आहे.
प्रती १ लाख लोकांमागे केवळ १.५ रहदारीशी संबंधित मृत्यू येथे होतात. ही सारी रस्ते अपघातांबाबतची माहिती प्रत्येकच वाहनचालकाने नोंद घेण्यासारखी आहे. नॉर्वेने अपघातांवर मिळविलेले नियंत्रण हा शोधाचा विषय आहे. यासाठी तेथील परिस्थितीचा अभ्यास केला जायला हवा. deaths-road-accidents मानवी मृत्यूंकडे संवेदनशीलतेने बघितले जायला हवे. कारण कुठल्याही रोगराईपेक्षा रस्ते अपघातातील बळींची भारतातील संख्या प्रचंड आहे. देशातील अपघातप्रवण क्षेत्र निश्चित करण्यासाठी सर्व रस्त्यांचे नव्याने सर्वेक्षण करणे, प्रत्येक रस्त्यावर सूचना फलक लावणे, रस्ते दुभाजकांचा आढावा घेणे, रस्ते वळणावरील झाडी-झुडपे हटवणे, खड्डे बुजविणे आदी उपाययोजना केल्या जातातच; पण अपघात बळींची वाढलेली संख्या बघता, या उपाययोजनांकडे अधिक गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. deaths-road-accidents अपघातानंतर उपचार न मिळाल्याने होणाऱ्या मृत्यूंची संख्याही वाढत आहे. अपघातांना आळा बसावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे दरवर्षी रस्ता सुरक्षा सप्ताह पाळला जातो. तरीही अपघातांची संख्या कमी होत नाही.
वैद्यकीय मदत वेळेवर न मिळाल्याने हजारो लोकांचा जीव जातो. त्यासाठी गोल्डन अवरमध्ये अपघातग्रस्तांना मदत मिळावी यासाठी आणखी प्रयत्न केले जायला हवे. जखमींना वेळेवर वैद्यकीय मदत पोहोचवली तर अनेकांचा जीव वाचवला जाऊ शकतो. अशा काही योजना पोलिस विभागातर्फे राबविल्याही जातात. deaths-road-accidents पण त्यात अधिक स्फूर्ती आणण्याची, मदतनीसांची संख्या वाढविण्याची, पोलिस मित्र अधिक सक्षम करण्याची गरज आहे. अपघातग्रस्तांना रुग्णालयात नेताना योग्य प्रकारे हाताळणी न झाल्यामुळे जखमीच्या शरीराला अधिक इजा होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे प्राणहानीचे प्रमाण वाढते. याकडे बघता पोलिस दलातील जवानांना अपघातग्रस्तांना हाताळण्याचे प्रशिक्षण देण्याची गरज आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन, चालकाचा निष्काळजीपणा यामुळे रस्ते अपघात वाढतात. त्यावरही नियंत्रण आणण्याची गरज आहे. deaths-road-accidents अनेक अपघातात चालकांचा बळी जातो. एक बळी जाणे म्हणजे त्या कुटुंबातील किमान चार ते पाच जण रस्त्यावर येणे असे समीकरण आहे.
त्याचवेळी अपघातातील मृत्यू हे तरुणाईलाच ओढून घेऊन जात असल्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. अशा परिस्थितीत मृत्यू गेलेल्या तरुणाचे कुटुंब हतोत्साहित होते. त्यांच्या जीवनाचा आधारच गमावला जातो. अनेक कुटंबातील सदस्य घरातील तरुण मुलगा अथवा मुलगी अपघातात दगावल्याने नैराश्याच्या गर्तेत जाण्याचीही गंभीर स्थिती निर्माण होते. deaths-road-accidents अशा कुटुंबांना वर्षानुवर्षे मानसोपचाराचा आधार घ्यावा लागल्याची उदाहरणे आपल्याच आसपास बघायला मिळतात. शालेय विद्यार्थ्यांची सुरक्षित वाहतूक ही रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची बाब असून शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणाऱ्या शालेय बस, स्कूल व्हॅन, तीन चाकी रिक्षा इत्यादी वाहनातून आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी धोकादायक पद्धतीने वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या विरुद्ध विशेष तपासणी मोहीम नियमितपणे राबविली जावी. deaths-road-accidents
रुग्णवाहिका १०८ सह तालुका आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका तातडीच्या प्रसंगी उपलब्ध करून दिल्या जाव्या. रस्त्यांवरील अपघात कमी व्हावे, अपघातातील जखमींना तत्काळ मदत मिळावी, यादृष्टीने अनेक स्वयंसेवी संस्था आताशी पुढे येत आहेत. त्यांनीही विविध उपाययोजना सुचवून, प्रसंगी शासनाच्या उपक्रमांमध्ये सहभागी होऊन अपघात बळींवर आळा घालण्याचे काम हाती घेतले आहे. deaths-road-accidents काही संस्थांनी स्वतःच्या अॅम्बुलन्सद्वारे सरकारचे काम आपल्या शिरावर घेतले आहे. या साèया प्रयत्नांचे कौतूक असले तरी अपघात बळींच्या वाढत्या संख्येवर आळा घालण्यासाठी तातडीने कंबर कसली जायला हवी.