‘दाह’ मराठी चित्रपट निर्माता संस्थेच्या निर्मात्यांचा सत्कार

01 Nov 2023 16:56:54
अर्जुनी मोरगाव, 
producers of Dah Marathi Film महाराष्ट्र शासन चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने दर्जेदार मराठी चित्रपट निर्मिती संस्थांचा सत्कार कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिर मुंबई येथे आयोजित करण्यात आला होता. यामध्ये युगंधर क्रिएशन निर्मित ‘दाह’ चित्रपटाचे निर्माते अनिकेत राजकुमार बडोले, दिग्दर्शक गणेश मोडक, संकल्पना मांडणारे माजी मंत्री राजकुमार बडोले, कथा लिहणरे अतुल सोनोणे याचा राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगट्टीवार यांचे हस्ते करण्यात आला.
 
 
producers of Dah Marathi Film
 
झाडीपट्टी व महाराष्ट्रातील प्रख्यात अभिनेते गिरीश ओक, सायली संजीव आदी प्रसिद्ध कलावंतासह एक मर्म स्पर्शी कथा असलेल्या मराठी चित्रपट ‘दाह’ हा सन 2019 ला तयार झाला असून सन 2020 ला महाराष्ट्रात प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाची मुख्य संकल्पना माजी मंत्री राजकुमार बडोले यांची होती. producers of Dah Marathi Film चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला. चित्रपटाची दखल घेत महाराष्ट्र शासन चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या वतीने ‘दाह’ चित्रपट संस्थेच्या निर्मात्यांचा सत्कार करण्यात आला. याबद्दल माजी मंत्री राजकुमार बडोले यांचे कार्यकर्ते, मित्रपरिवार व शेकडो कलावंतांनी अभिनंदन केले आहे.
Powered By Sangraha 9.0