अहमदाबाद,
Annapurna Yojana गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी शुक्रवारी श्रमिक अन्नपूर्णा Annapurna Yojana योजनेअंतर्गत राज्यभरात १५५ नवीन केंद्रांचे उद्घाटन केले. या योजनेंतर्गत बांधकाम कामगारांना फक्त ५ रुपयांमध्ये गरम जेवण पुरविण्यात येणार आहे. ही योजना २०१७ मध्ये भाजपा सरकारने १० जिल्ह्यांमध्ये ११८ केंद्रांसह सुरू केली होती. आणखी सात जिल्ह्यांमध्ये १५५ नवीन केंद्रांची भर पडल्यास अशा अन्न वितरण केंद्रांची एकूण संख्या २७३ होईल.
राज्यभरातील सुमारे ७५ हजार मजुरांना Annapurna Yojana या योजनेचा लाभ होईल, असे भूपेश पटेल म्हणाले. त्यांनी शहरातील वैष्णोदेवी परिसरातील एका केंद्राला भेट दिली आणि लाभार्थी कामगारांसोबत भोजन केले. एका मेळाव्याला संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले की, गुजरातमधील जवळपास ३ लाख विक्रेत्यांनी पीएम स्ट्रीट व्हेंडरच्या आत्मनिर्भर निधी योजनेचा लाभ घेतला आहे, जे लहान व्यापारी आणि विक्रेत्यांना कर्ज पुरवते.