गणेशपेठ बसस्थानकावर गर्दीच गर्दी

10 Nov 2023 19:58:11
नागपूर,
Ganeshpeth bus station : दिवाळीनिमित्त रेल्वेत प्रचंड गर्दी झाल्यानंतर आता बसमधून प्रवास करताना प्रवाशांना चांगलीच सर्कस करावी लागत आहे. स्थानिक गणेशपेठ बसस्थानकावर बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांची गर्दी वाढली आहे. सर्वच मार्गावरील बसेसमध्ये जागा नसल्याने अनेकांना गर्दीतून प्रवास करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. एसटी महामंडळाने अनेक मार्गावर जादा बसेस सोडल्या आहेत. यामुळे प्रवाशांची सोय झाली आहे.

Ganeshpeth bus station
 
रात्री उशिरापर्यंत बसस्थानक गजबजलेले
मुख्यत: गणेशपेठ बसस्थानक Ganeshpeth bus station येथून लांब पल्ल्याच्या बसेस सोडण्यात येत असल्याने त्यात सुध्दा प्रवाशांची गर्दी झाली आहे. मुख्य बसस्थानकावर सकाळपासून तर रात्री उशिरापर्यंत गजबजलेले दिसून येत आहे. लांबचा प्रवास करताना बसमध्ये जागा मिळावी यासाठी प्रवासी रुमाल टाकून आपी जागा निश्चित करण्याचा प्रयत्न करीत आहे. एकंदरीत बसस्थानकाच्या परिसरात प्रवाशांची धावपळ स्पष्ट दिसून येत आहे. गणेशपेठ बसस्थानकावर फलाटांची संख्या कमी असल्याने मोकळया जागेतच बस उभी करावी लागत आहे. दोन्ही बाजूच्या प्लॅटफॉर्मवर जागा नसल्याने गणेशपेठ बसस्थानाच्या मुख्य मार्गावर बस लावण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. ही वर्दळ आता पुन्हा दहा दिवस राहण्याची शक्यता एसटी महामंडळाने व्यक्त केली आहे.
 
 
खाजगी वाहनांचा आधार
दिवाळीचा सणानिमित्त बाहेरगावी जाणारे प्रवासी रेल्वेचे आरक्षण न मिळाल्यास बसकडे धाव घेतात. बसस्थानकावर जी बस उपलब्ध होईल त्यातून प्रवास करीत आहे. सर्वच मार्गावरील Ganeshpeth bus station बसमध्ये प्रवाशांची गर्दी झाल्याने काहींनी आता खाजगी वाहनांचा आधार घेतला आहे. नियमितपणे प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना गर्दीचा फटका बसत आहे.
 
 
एसटी झाली आता सोयींची
शहराबाहेरील नागरिक नागपूर शहरात खरेदीसाठी येतात. Ganeshpeth bus station एसटी महामंडळाच्या सवलतीमुळे अनेक प्रवासी एसटीतून प्रवास करीत असतात. त्यात आवश्यक कामानिमित्त बाहेरगावी जाणार्‍या प्रवाशांना पर्याय नसल्याने एसटी हीच आता सोयींची झाली आहे. दिवाळीच्या खरेदीसोबत इतर कामानिमित्ताने प्रवास करणार्‍यांची संख्या दुप्पट वाढली आहे.
 
 
21 फलाट बांधण्याचे काम अर्धवट
गणेशपेठ Ganeshpeth bus station बसस्थानकांवरुन दररोज 600हून अधिक बस गाडयांची ये-जा होत असते. आगारातील बसेसची संख्या लक्षात घेता नव्या 21 फलाट बांधण्याचे काम गत 3 वर्षांपासून प्रलंबित आहे. एसटी महामंडळाने खाजगी कंत्राटदाराला काम दिल्यानंतरही हे काम आता थांबले आहे. कंत्राटदाराने अर्धवट काम सोडून दिल्याने एसटीचा परिसर विद्रूप स्वरुपात दिसून येत आहे.
Powered By Sangraha 9.0