आधारभूत धान खरेदी केंद्रांची संख्या वाढली

10 Nov 2023 19:37:46
तभा वृत्तसेवा
भंडारा, 
Paddy procurement centers : शासकीय आधारभूत किंमत धान खरेदी योजना खरीप पणन हंगाम 2023-24 मधील धान खरेदी करिता शासनाच्या एनईएमएल पोर्टलवर ऑनलाईन नोंदणी सुरु झालेली आहे. जिल्ह्यातील शेतक-यांनी आपल्या सोयीनुसार जवळच्या कुठल्याही धान खरेदी केंद्रावर जाऊन नोंदणी पुर्ण करावी व शासनाच्या आधारभूत किंमत खरेदी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.

Paddy procurement centers 
 
भंडारा जिल्ह्यातील एकूण 54 केंद्रांवरून नोंदणी सुरू झाली आहे. Paddy procurement centers धान खरेदी केंद्रावर नोंदणी करतांना प्रत्यक्ष लाईव्ह फोटो अपलोड करणेसह, चालू हंगामाचा पिकपेरा असलेला सातबारा उतारा, नमुना 8-अ, अद्यावत बँकेचे पासबुक अथवा रद्द केलेला धनादेश, अद्यावत मोबाईल क्रमांक आणि आधार कार्ड ही कागदपत्रे लागणार आहेत. शेतकèयांनी लवकरात लवकर धान खरेदी केंद्रावर जावून आपली नोंदणी करून घ्यावी असे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
Powered By Sangraha 9.0