यवतमाळकर डॉ. स्मिता अलोणी यांचे आकाशवाणीवर दिवाळी कीर्तन

    दिनांक :10-Nov-2023
Total Views |
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, 
Dr. Smita Aloni : दरवर्षी दिवाळीनिमित्त नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे संपूर्ण महाराष्ट्रात एकाचवेळी कीर्तन प्रसारित करण्याची आकाशवाणीची परंपरा आहे. या परंपरेत यंदाचे कीर्तन सादर करण्याची संधी यवतमाळकर डॉ. स्मिता संदीप अलोणी Dr. Smita Aloni  यांना मिळाली आहे. रविवार, 12 नोव्हेंबर रोजी पहाटे 5 ते 6 दरम्यान महाराष्ट्रातील सर्व आकाशवाणी केंद्रांवरून त्यांचे कीर्तन प्रसारित होणार आहे. डॉ. स्मिता अलोणी या तत्त्वज्ञान, इतिहास या विषयांत पारंगत असून त्यांनी संगीतशास्त्र विषयात डॉक्टरेट ही पदवी प्राप्त केली आहे. कीर्तन, भागवत, प्रवचनांचा वारसा त्यांना त्यांच्या घरातूनच परंपरेने मिळाला आहे.
 
Dr. Smita Aloni
 
डॉ. स्मिता अलोणी Dr. Smita Aloni 13 वर्षांपासून कीर्तन क्षेत्रात कार्यरत असून संपूर्ण महाराष्ट्रासह गोवा, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध‘प्रदेश, उत्तरप्रदेश, गुजरात अशा विविध राज्यांमध्ये त्यांना कीर्तन, प्रवचन, व्या‘यान, भागवत, रामकथा असे विविध कार्यक‘म यशस्वीरित्या सादर केले आहेत.