डॉक्टराने ६०० रुग्णांना बसवले खोटे पेसमेकर

२०० जणांचा मृत्यू सैफई मेडिकल कॉलेजमधील धक्कादायक प्रकार

    दिनांक :10-Nov-2023
Total Views |
इटावा, 
pacemakers उत्तर प्रदेशातील इटावामध्ये एक धक्कादायक व अजब प्रकार उघड झाला आहे. pacemakers सैफई मेडिकल कॉलेजच्या एका डॉक्टरने परदेशात जाण्याच्या लालसेपोटी गरीब रुग्णांच्या जीवाशी खेळ खेळला आहे. समीर सराफ नावाच्या या डॉक्टरने सुमारे ६०० रुग्णांना खोटे पेसमेकर लावले. त्यामुळे आतापर्यंत २०० रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, पोलिसांनी डॉक्टर समीर सराफ याला खोटे पेसमेकर लावल्याप्रकरणी अटक केली आहे.
 

pacemakers 
 
सैफई मेडिकल कॉलेजच्या कार्डिओलॉजी विभागात कार्यरत असलेल्या डॉ. समीर सराफ याने एसजीपीजीआयने निश्चित केलेल्या किमतीपेक्षा जास्त दराने रुग्णांना खोटे पेसमेकर pacemakers बसवले होते. रुग्णाच्या कुटुंबीयांच्या तक्रारीनंतर सैफई मेडिकल कॉलेज प्रशासनाने चौकशी समिती स्थापन केली होती. यानंतर चौकशीत रुग्णांनी केलेली तक्रार खरी असल्याचे निष्पन्न झाले असून निश्चित केलेल्या किमतीपेक्षा नऊपट अधिक किमत आकारण्यात आल्याचे चौकशी समितीच्या तपासातून उघड झाले असून खोट्या पेसमेकरचीही pacemakers पुष्टी झाली आहे. यानंतर तज्ज्ञांचे राज्यस्तरीय तपास पथक तयार करण्यात आले. तसेच सैफई वैद्यकीय महाविद्यालयाचे तत्कालीन कुलसचिव सुरेशचंद शर्मा यांनी तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक प्राध्यापक डॉ. आदेश कुमार यांना पत्र लिहिले होते, ज्यात ही बाब रुग्णालयाशी संबंधित असल्याचे म्हटले होते.
 
या प्रकरणाचा तपास पीजीआय पोलिस चौकीचे तत्कालीन प्रभारी उपनिरीक्षक केके यादव यांनी केला आणि गुन्हा दाखल करण्यात आला होता. सैफई मेडिकल कॉलेजच्या कॅथ लॅबसाठी एक ते दीड वर्षाची उपकरणे उपलब्ध असूनही डॉ. समीरने २०१९ मध्ये जवळपास १ कोटी रुपयांची अनावश्यक pacemakers उपकरणे खरेदी केल्याचा आरोपही त्यांच्यावर करण्यात आला. यात डॉ. समीरने लाखो रुपयांची हेराफेरी केली असून मेडिकल कॉलेजच्या प्रशासनाने अनेक पातळ्यांवर चौकशी केल्यानंतर पेमेंट थांबवले होते.
सरकार पीडितांसोबत : उपमुख्यमंत्री
मध्य प्रदेशातून परतलेले उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य गुरुवारी सैफई हवाई पट्टीवर काही काळ थांबले होते. तेव्हा त्यांना डॉ. समीर pacemakers प्रकरणाबाबत प्रश्न विचारल्यावर ते म्हणाले, ज्या लोकांना या समस्यांचा सामना करावा लागला आहे त्या सर्वांना सरकार शोधून काढेल आणि त्यांचे प्राण वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल.