नागपूर,
Diwali Pahat मित्र परिवार प्रभू नगर आणि न्यू मनीष नगर तर्फे आयोजित दिवाळी पहाट हा हिंदी मराठी गीतांचा सुमधुर कार्यक्रम स्वरमोहिनी म्युझिक गृपतर्फे प्रस्तुत करण्यात आला. या कार्यक्रमाला सत्तापक्ष नेते अविनाश ठाकरे उपस्थित होते. शाम बापटे, स्मृती मूलमुले, अंशू बुटी, सूर्यवंशी,पतंगे ह्यांनी सुमधुर गीते सादर करून रसिक प्रेक्षकांना आपल्या आवाजाने मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाची रंगत अविनाश ठाकरे यांच्या गायनाने अधिक वाढली.Diwali Pahat यावेळी त्यांनी दोन गीतं सादर केली. राज चौधरींनी सूत्रसंचालन केले.'पसायदान'आणि अल्पोपहाराने कार्यक्रमाची सांगता झाली. प्रभुनगरच्या रसिक श्रोत्यांनी कार्यक्रमास उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
सौजन्य : स्वाती फडणवीस,संपर्क मित्र