महाराष्ट्राच्या कामगिरीकडे प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष

    दिनांक :11-Nov-2023
Total Views |
वेध
 मिलिंद महाजन 
National Sports Competition : यंदाच्या सुदृढ खेळाडूंच्या आशियाड क्रीडा स्पर्धेत तसेच दिव्यांग खेळाडूंच्या आशियाड पॅरा क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी नेत्रदीपक कामगिरी केली. भारताने आशियाडमध्ये प्रथमच सर्वाधिक 101 पदके तर पॅरा आशियाडमध्ये 111 पदके जिंकलीत. भारतीय खेळाडूंनी आशियाई स्तरावर स्पृहणीय कामगिरी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही या सर्वांची मुक्त कंठाने प्रशंसा केली. समस्त भारतीयांनाही खेळाडूंच्या कामगिरीबद्दल अभिमान वाटला. प्रसारमाध्यमांनी भारतीय खेळाडूंचे भरभरून कौतुक केले, सध्या आयसीसी वन-डे क्रिकेट विश्वचषकाच्या रणधुमाळीत सर्वांचे लक्ष क्रिकेट सामन्यांकडे वेधल्या गेले. क्रीडा रसिक व प्रसारमाध्यम क्रिकेटपायी वेडे झाले, परंतु सर्वच जण क्रिकेटवरील चर्चेतच रंगले. विद्यमान इंग्लंड संघाची कामगिरी इतकी रसातळाला का गेली? विराट कोहली व रचिन रवींद्रने क्रिकेटच्या देवाचा कोणता विक्रम मोडला? कोणता संघ उपांत्य फेरी गाठेल? कोणता संघ विश्वचषक जिंकेल? भारत व पाकिस्तान यांच्यात उपांत्य सामना होईल का, याबाबत सर्वाधिक चर्चा होत आहे. परंतु, गोव्याची राजधानी पणजीमध्ये 37 व्या National Sports Competition राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील खेळाडूंच्या कामगिरीकडे तसेच पुण्याजवळील फुलगावमध्ये आयोजित प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेकडेही क्रीडा रसिक व प्रसारमाध्यमांचे दुर्लक्ष झाले.
 
National Sports Competition
 
वास्तविक या राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राच्या खेळाडूंनी National Sports Competition सर्वोत्तम कामगिरी केली. यंदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्रातून 900 खेळाडू सहभागी झालेत. हरयाणाच्या खेळाडूंची संख्या महाराष्ट्राच्या खेळाडूंपेक्षा अधिक होती, पण तरीही महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जिद्द, चिकाटी, गुणवत्ता, कठोर परिश्रम व कौशल्याच्या जोरावर अभूतपूर्व व अविस्मरणीय 80 सुवर्ण, 69 रौप्य, 79 कांस्यपदकांसह 228 पदके जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने पदक तालिकेत अव्वल स्थान मिळविले तसेच सर्वसाधारण अजिंक्यपदाचा मान मिळविला. महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो-खो संघांनी सुवर्णपदकांची हॅट्ट्रिक साजरी केली. महाराष्ट्राची जिम्नॅस्ट संयुक्ता काळे हिने सर्वोत्तम महिला क्रीडापटूचा मान मिळविला. स्पर्धेत सेनादल (66 सुवर्णांसह 126 पदके) व हरयाणाने (62 सुवर्णांसह 192 पदके) अनुुक्रमे दुसरे व तिसरे स्थान प्राप्त केले.
 
 
देशात एकीकडे क्रिकेट जोरात सुरू असताना दुसरीकडे गोव्यात National Sports Competition महाराष्ट्राचे खेळाडू राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत वर्चस्व गाजवित होते; मात्र त्यांच्या कामगिरीची माध्यमांनी हवी तशी दखल घेतली नाही. महाराष्ट्राच्या पुरुष व महिला खो-खो संघाने जेव्हा विजेतेपद पटकावले, तेव्हा त्यांची पाठ थोपटण्यासाठी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बन्सोडे गोव्यात गेले होते. गोव्याचे मु‘यमंत्री मु‘यमंत्री प्रमोद सावंत यांनीही महाराष्ट्राच्या खेळाडूंचे कौतुक केले.
 
 
यंदाच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत गटका, लगोरी, पिंच्याक सिल्याट, कलारीपयट्टू यांच्यासारख्या देशातील पारंपरिक क्रीडा प्रकारांचाही समावेश केल्याबद्दल उपराष्ट्रपती जगदीश धनकड व भारतीय ऑलिम्पिक संघटनेच्या अध्यक्ष पी. टी. उषा यांनी आनंद व्यक्त केला व भविष्यात या क्रीडा प्रकारांना ऑलिम्पिकमध्ये स्थान मिळविण्याची संधी असेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला. या राष्ट्रीय स्पर्धेतील पदक विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहन म्हणून सुवर्णपदक विजेत्याला 7 लाख रुपये, रौप्यपदक विजेत्याला 5 लाख रुपये व कांस्यपदक विजेत्याला 3 लाख रुपये रोख पारितोषिक देण्यात येणार आहे, अशी घोषणा महाराष्ट्राचे क‘ीडा मंत्री संजय बन्सोडे यांनी केली.
 
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठबळामुळे National Sports Competition गुणवंत खेळाडू जागतिकस्तरावर सर्वोत्तम कामगिरी करत भारताच्या लौकिकास साजेशी कामगिरी करीत आहे. आशियाई, ऑलिम्पिक व जागतिक अजिंक्यपदसारख्या स्पर्धेत भारताच्या यशात मराठमोळ्या खेळाडूंचा वाटा वाढावा, यासाठी महाराष्ट्र शासन प्रयत्नशील असणार आहे.
 
- 7276377318