आज पाडवा म्हणजेच बलिप्रतिपदा...जाणून घ्या कथा

14 Nov 2023 09:03:16

Balipratipada कार्तिक शुद्ध प्रतिपदेला बलिप्रतिपदा हा दिवस दिवाळी पाडवा म्हणून साजरा केला जातो.अश्विन महिन्यातील अमावास्येला लक्ष्मीपूजन झाल्यानंतर पाडवा म्हणून साजरा जातो. यावर्षी पाडवा येत्या मंगळवारी म्हणजेच १४ नोव्हेंबरला पाडवा साजरा केला जाणार आहे.साडेतीन मुहूर्तांपैकी एक पाडवा मानला जातो. दिवाळीच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी दिवाळी पाडवा सण साजरा केला जातो.या दिवशी सोने,नवीन घर, वाहन यांसारख्या अनेक गोष्टींची खरेदी केली जाते.

 

balipratipada 
 
पौराणिक कथेनुसार,राक्षस कुळाचे बळीराजा याने देवांचा पराभव केला. मात्र, तो दानशूर होता. कोणत्याही गोष्टीचे दान करताना तो मागे पुढे पाहत नसे. एकदा त्याने यज्ञ केले असता भगवान विष्णू बटू वामनाचा अवतार घेऊन त्याच्याकडे भिक्षा मागायला गेले. तेव्हा बळी राजाने त्याला काय हवे आहे असे विचारले असता यावर बटू वामनाने त्याच्याकडे तीन पाऊल जमीन मागितली. बळीराजाला वाटले कि तीन पावलाच जमीन मागितली,म्हणून दानवीर बळीराजा दान देण्यास तयार झाला.दान मिळताच वामनाने विराट रूप धारण केले आणि पहिल्या पावलाने पृथ्वी आणि दुसऱ्या पावलाने संपूर्ण अंतराळ व्यापून घेतले.Balipratipada त्यानंतर बटू वामनाने त्याला तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे विचारले.त्यावर बळीराजा म्हणाला की तिसरे पाऊल माझ्या डोक्यावर ठेवा. वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळलोकी पाठवले व पाताळात बळीराजाचे राज्य स्थापन झाले.बळीराजाने विष्णू बटू वामनाला पाताळात जाण्याआधी  पृथ्वीवर दरवर्षी तीन दिवस तरी माझे राज्य म्हणून ओळखले जावे असा एक वर मागितला. वामनाने वर दिला. वामनाने दिलेल्या वरामुळेच कार्तिक शुद्ध प्रतिपदेला नागरिक बळीराजाच्या दानशूरतेची आणि क्षमाशीलतेची पूजा केली जाते.
Powered By Sangraha 9.0