सीएमने बजरंग नर वाघाला केले ठार

14 Nov 2023 18:02:06
मोहर्ली, 
 
tadoba-bajrang-killed कोणताही प्रबळ नर वाघ त्याच्या क्षेत्राचे आणि त्याच्या छाव्यांचे रक्षण करतो. बरेचदा यामुळे वाघांच्या झुंजी होतात आणि वाघ मृत्युमुखी पडतात. tadoba-bajrang-killed ताडोबातील बजरंग हा नर वाघ हा एकेकाळी मोहर्ली श्रेणीतील प्रबळ वाघ म्हणून ओळखला जात होता. मोहर्ली येथील छोटा दडियाल नर वाघाला हुसकून लावत बजरंगने आपले साम्राज्य स्थापन केले होते.
 
Bajrang male tiger
 
tadoba-bajrang-killed नंतर बजरंग देवडा आगरझरी झोनच्या आसपासच्या प्रदेशासाठी धडपडताना दिसला आणि उन्हाळ्यातही तो निमढेलाच्या आसपास गुरे मारताना दिसला. दुर्दैवाने तो आज निमढेलाच्या आसपास सीएमसोबत लढाई हरला. ताडोबाच्या मोहर्ली देवडा आगरझरी झोनच्या आसपास राहत होता. tadoba-bajrang-killed धिप्पाड शरीरयष्टीचा हा वाघ म्हणजे ताडोबाची शान होता. त्याने या व्याघ्र प्रकल्पातील मोठ्या क्षेत्रावर स्वत:चे साम्राज्य स्थापन केले होते. २०१५ मध्ये मोहर्लीत जेव्हा कोणत्याही वाघाचे वर्चस्व नव्हते तेव्हा अचानक त्याठिकाणी ‘बजरंग’ पोहोचला. tadoba-bajrang-killed तो कोलारा बफर परिसरातून आल्याची चर्चा होती.
 
त्यानंतर ‘बजरंग’ने आपले क्षेत्र वाढवण्यास सुरुवात केली. यादरम्यान अनेक वाघिणी त्याच्या अधिपत्याखाली आल्या. tadoba-bajrang-killed अनेक छाव्यांचा तो जन्मदाता असला तरी वाघिणींना आपलेसे करण्यासाठी त्याने अनेक शावकांचा बळी देखील घेतला. सोनम, लारा, मोना, नवीन वाघडोह, देवडोह, देवडोह नवीन मादी, कोलारा बफर वाघीण, छोटी तारा अशा अनेक वाघिणींशी त्याची जोडी जमली. tadoba-bajrang-killed ताडोबातील कोणत्याही वाघांपैकी तो कदाचित सर्वात मोठा वाघ होता. सर्वाधिक वाघिणींना आपल्या अधिपत्याखाली आणण्याचा कदाचित त्याचा रेकॉर्ड आहे. tadoba-bajrang-killed ताडोबा हे ‘बजरंग’चे साम्राज्य आहे, अशी चर्चा असताना आजच्या लढाईत सीएमने त्याला पराभूत केले. या लढाईत झालेल्या जखमांमुळे बजरंगचा मृत्यू झाला आहे. 
Powered By Sangraha 9.0