हैदराबाद,
BRS-BJP : तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यात बीआरएस अर्थात् भारत राष्ट्र समिती आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांत जोरदार संघर्ष उडाला. यातील काही जखमींवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. नागार्जुन सागर पोटनिवडणुकीच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी बीआरएस उमेदवार निवडून आल्यास नेल्लीकल लिफ्ट सिंचन योजना पूर्ण करणार असल्याचे आश्वासन दिले होते.
परंतु, अद्यापही ही योजना पूर्णत्वास आली नाही. या मुद्यावर BRS-BJP भाजपाच्या वतीने मंगळवारी नागार्जुन सागरात केसीआर यांच्या प्रचारसभेच्या विरोधात भाजपाचे श्रीधर रेड्डी यांनी नेल्लीकल येथे धरणे आंदोलन केले. यावरून बीआरएस पक्षाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी श्रीधर रेड्डी यांच्यावर हल्ला चढविला. यात जखमी झाल्याने त्यांना नलगोंडा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले.
भाजपा प्रदेशाध्यक्ष तसेच केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी घटनेचा निषेध केला असून, चौकशी मागणी केली आहे.