उंबर्डा बाजार येथे निघाली गोमातेची मिरवणूक

गोंधनचे औचित्य
* शेकडो वर्षाची परंपरा कायम

    दिनांक :15-Nov-2023
Total Views |
उंबर्डा बाजार,
Umbarda Bazar : दिवाळी गोवर्धनपूजा निमित्त गोमातेची गांवातुन वाजतगाजत मिरवणूक काढण्याची शेकडो वर्षाची परंपरा ग्राम उंबर्डा बाजार येथे आजही कायम आहे. १४ रोजी गोमातेची गावातून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. सविस्तर असे की, शेकडो वर्षा पासून ग्राम उंबर्डा बाजार येथे लक्ष्मी पुजनाच्या दुसर्‍या दिवशी गोवर्धनपूजानिमित्त गोमातेची गावातून मिरवणूक काढण्याची परंपरा आजही कायम आहे.
 
Umbarda Bazar
 
यानिमित्ताने गोपालक सकाळीच गायींना स्वच्छ धुवून त्यांना फुलांच्या हारांनी सजवून रंगरंगोटी करून गोड नैवेद्य दाखविला जातो. तद्नंतर सर्व गायी एकत्र समवून प्रमुख गुराख्यांच्या मार्गदर्शनात गावातील प्रमुख मार्गावरून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. Umbarda Bazar गावातील प्रमुख मार्गाने मिरवणूक जात असतांना गावच्या मानाच्या हनुमान मंदिराला गायीच्या कळपाची प्रदक्षिणा पाहण्याचा सोहळा विलोभनीय असतो. हा सोहळा पाहण्यासाठी ग्रामस्थांची मोठी गर्दी होती. मिरवणूक मार्ग रांगोळ्यानी सजवून ठिकठिकाणी चार्‍याची व्यवस्था करण्यात आली होती. त्यानंतर इंदिरानगर झोपडपट्टी जवळून मिरवणुकीला सुरुवात होऊन महादेव मंदिरा नंतर शांती चौक, गांधी चौक, शिवाजी चौक मार्गे मिरवणुकीचा समारोप भाजी बाजार चौकात करण्यात आला असता यावेळी ग्रामस्थांच्या वतीने फटायाची जोरदार आतिषबाजी करण्यात आली. यावेळी गावकर्‍यांची उपस्थिती लक्षणीय होती.