- श्यामकांत जहागीरदार
नवी दिल्ली,
MP Assembly Election : मध्यप्रदेश विधानसभा प्रचारात मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांची ‘मुख्यमंत्री लाडली बहना’ योजना भाजपासाठी लाभदायक सिद्ध होत आहे. राज्यातील महिलांचा विश्वास जिंकण्यात ही योजना यशस्वी ठरली आहे. या सुरुवातीच्या काळात काहीसे नकारात्मक असलेले वातावरण भाजपासाठी आता पूर्णपणे सकारात्मक झाले आहे. राज्यातील समस्त महिला भगिनी असल्याचे चौहान मानतात आणि त्यांच्या आर्थिक स्वावलंबनाच्या अनेक योजना राबवत असतात. राज्यातील महिलाही चौहान यांच्याकडे भाऊ म्हणून पाहतात. त्यामुळे या महिलांच्या मुला-मुलींचे मामा म्हणून ते राज्यात ओळखले जातात. राज्यात कुठेही प्रचारासाठी गेल्यावर मामा-मामा म्हणून त्यांचे स्वागत केले जाते.
एप्रिल महिन्यात चौहान यांनी राज्यातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल वर्गातील महिलांसाठी ‘लाडली बहना’ची घोषणा केली. या योजनेसाठी 1 कोटी 25 लाखावर महिलांनी नोंदणी केली होती. या MP Assembly Election योजनेनुसार नोंदणी करणार्या पात्र महिलांना दरमहा एक हजार रुपये दिले जात होते. चौहान यांनी ऑक्टोबर महिन्यापासून ही राशी 1,250 रुपये केली. पैशाची व्यवस्था झाल्यावर महिलांना दरमहा 1,500 रुपये देण्याची माझी इच्छा आहे, असे आश्वासन एका प्रचारसभेत चौहान दिले. 21 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या पण विवाह न केलेल्या तसेच घरी ट्रॅक्टर असल्यामुळे काही महिला या योजनेसाठी आतापर्यंत पात्र ठरत नव्हत्या. नंतर अशा सहा महिलांनी या योजनेत सामावून घेण्यात आले. त्यामुळे या योजनेच्या लाभार्थ्यांची सं‘या 1 कोटी 25 लाखांवरून 1 कोटी 31 लाखांवर गेली. या महिलांच्या खात्यात 1,269 रुपये जमाही करण्यात आले.
या MP Assembly Election योजनेसाठी आतापर्यंत आपले नाव नोंदवू न शकणार्या महिला राज्यातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया आटोपल्यानंतर आपले नाव नोंदवू शकतील, असे ते म्हणाले. चौहान यांची लाडली लक्ष्मी योजनाही खूप लोकप्रिय आहे. या मुलीचा जन्म झाल्यावर तिच्या नावाने पाच वर्षांपर्यंत दरवर्षी सहा हजार रुपयांचे राष्ट्रीय बचत प्रमाणापत्र घेतले जाते. याप्रकारे पाच वर्षांत प्रत्येक मुलीच्या खात्यात 30 हजार रुपये जमा होतात. मुलगी सहावीत गेल्यावर तिला दोन हजार, नववीत गेल्यावर चार हजार तर अकरावीत गेल्यावर आणखी साडेसात हजार रुपये मिळतात.
याप्रमाणे प्रत्येक मुलीला 21 झाल्यावर 1 लाख रुपये मिळण्याची तरतूद शिवराजसिंह चौहान यांनी केली. MP Assembly Election याशिवाय सरकारी शाळात 12 वीत जास्तीत जास्त गुण मिळवणार्या तीन विद्यार्थी तसेच विद्यार्थिनींना स्कुटी घोषणाही चौहान यांनी केली आहे. या योजनांनी महिला वर्गात चौहान यांची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. भाजपाच्या या योजनांना महिलांच्या मिळणार्या प्रतिसादांनी काँग्रेसच्या तोंडचे पाणी पळाले आहे. या योजनेच्या लोकप्रियतेची काँग्रेसलाही जाणीव झाली असून, त्यांनी या योजनेत दरमहा 1500 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे.