1000 हेक्टरची क्षमता तरी दर्जावाढ रखडली

16 Nov 2023 18:53:04
गोंदिया, 
Tedha-lemon farmers : गोरेगाव तालुक्यातील निंबा येथे मोठे तलाव आहेत. या तलावात परिसरातील एक हजार एकर शेतीला सिंचन करण्याची क्षमता आहे. मात्र, त्यासाठी तलावाला लघू प्रकल्पात परावर्तीत करणे गरजेचे आहे. त्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची गरज आहे. तालुक्याच्या अंतिम टोकावर असलेल्या लिंबा व परिसरातील 15 गावांची अर्थव्यवस्था केवळ शेतीवर अवलंबून आहे. या परिसरात कलपाथरी प्रकल्प असून देखील येथील शेतकर्‍यांना प्रकल्पाच्या सिंचन सुविधा मिळत नाही. त्यामुळे लिंबा येथे असलेल्या तलावाला लघू प्रकल्पाचा दर्जा देण्यात यावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
 
Tedha-lemon farmers
 
लिंबा येथे असलेला तलाव या परिसरातील सर्वात मोठा माजी मालगुजारी तलाव आहे. Tedha-lemon farmers हा तलाव 50 एकर क्षेत्रफळात विस्तारलेला असून देखील या तलावातून पाहिजे त्या प्रमाणात शेतकर्‍यांना सिंचन होत नाही. मामा तलावातून लघू प्रकल्पात परावर्तीत केल्यास लिंबा गावासह परिसरातील तेढा, तिल्ली, मोहगाव, चोपा, तुमसर, हौसीटोला, हिराटोला आदी 15 गावातील शेतकर्‍यांना याचा लाभ मिळू शकतो. उल्लेखनीय म्हणजे, लघू तलावाला सिंचन प्रकल्पात परावर्तीत केल्यास एकाही गावाचे पुनर्वसन करण्याची गरज नाही. त्यामुळे लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने शेतकरी हितासाठी पुढाकार घेण्याची गरज आहे.
 
 
वन्यप्राण्यांचीही भागणार तहाण
हा परिसरात व्याघ्र प्रकल्पात समाविष्ठ आहे. Tedha-lemon farmers लिंबा तलावाचे लघू प्रकल्पात रुपांतर झाल्यास वर्षभर जलसाठा उपलब्ध राहणार असून वन्यप्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. तसेच 800 ते 1000 हजार हेक्टर सिंचनात वाढ होणार असून पर्यटनदृृष्टयाही फायद्याचे ठरणार आहे.
Powered By Sangraha 9.0