प्रदूषणाचा धोका

    दिनांक :16-Nov-2023
Total Views |
विचार विनिमय
Air pollution : नुकत्याच आलेल्या एका अहवालानुसार, ऑक्टोबर महिन्यात दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी गेल्या पाच वर्षांतील देशातील प्रदूषणाच्या पातळीच्या तुलनेत सर्वाधिक होती. आणखी एका अहवालानुसार वर्ष 2021 पासून हवेची गुणवत्ता गंभीरपणे खालावत असून, राजधानी दिल्लीतील परिस्थिती अधिक गंभीर असल्याचे आढळून आले आहे. अहवालात म्हटले आहे की, दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता या शहरांमध्ये ऑक्टोबरच्या प्रदूषणाची पातळी इतर महिन्यांच्या तुलनेत जास्त नोंदविली गेली आहे. देशातील दिल्ली, मुंबई, हैदराबाद आणि कोलकाता या चार प्रमुख शहरांमधील वायू प्रदूषण वाढले आहे. त्याच वेळी लखनौ आणि पाटणा येथील हवेच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा झाली आहे. मात्र संपूर्ण देशाची स्थिती पाहिली तर सर्वत्र प्रदूषणाने गंभीर रूप धारण केल्याचे स्पष्ट होते. वायू प्रदूषणासोबत ध्वनी आणि जलप्रदूषण सार्वजनिक आरोग्यासाठी धोक्याचे आहे. मुले, वृद्ध आणि विद्यमान आरोग्य समस्या असलेले लोक असुरक्षित असून, ते केव्हाही याला बळी पडू शकतात.
 
Air pollution
 
प्रदूषणाच्या Air pollution वाढत्या पातळीमुळे श्वसनाचे आजार, हृदयविकार आणि अगदी कॅन्सरची शक्यता वाढते, हे सांगावे लागू नये. त्याचा एकूण जीवनमान आणि आयुर्मानावर परिणाम होतो. वाहनांचे उत्सर्जन हे भारतीय शहरांमधील वायू प्रदूषणाचे प्रमुख कारण आहे. वाहनांच्या विशेषतः डीझेलवर चालणार्‍या वाहनांच्या सं‘येत झपाट्याने वाढ होत असून, त्यामुळे हवेतील प्रदूषकांमध्येही वाढ झाली आहे. अकार्यक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था आणि सिंगल-ऑक्युपेन्सी वाहनांमुळे या समस्येत अधिकच भर पडते. उद्योगांची अनियंत्रित वाढ आणि कठोर नियमांचा अभाव, यांचे वायू प्रदूषणात लक्षणीय योगदान आहे.
 
 
कारखाने वातावरणात सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड आणि पार्टिक्युलेट मॅटर यांसारखे हानिकारक प्रदूषक उत्सर्जित करतात. शहरी भागातील उद्योगांच्या केंद्रीकरणामुळे हवेची गुणवत्ता आणखी खालावते. वायू प्रदूषणाबरोबरच ध्वनी आणि जलप्रदूषणाच्याही समस्या कायम आहेत. Air pollution वायू प्रदूषणाचा सामना करण्यासाठी आपल्याला ऊर्जेच्या स्वच्छ स्त्रोतांकडे वाटचाल करावी लागेल. इलेक्ट्रिक वाहनांच्या (ईव्ही) वापराला प्रोत्साहन देणे, अक्षय ऊर्जा स्त्रोतांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. कार्यक्षम आणि परवडणारी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था खाजगी वाहनांवरील अवलंबित्व कमी करू शकते, ज्यामुळे वाहनांमधून होणारे उत्सर्जन कमी होईल.
 
 
सार्वजनिक वाहतुकीच्या पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करणे, सायकल चालवणे आणि चालणे यांना प्रोत्साहन देणे देखील स्वच्छ हवा राखण्यात योगदान देऊ शकते. उद्योगांना कठोर नियम आणि उत्सर्जन मानकांची अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. स्वच्छ इंधन वापरणे आणि कचरा व्यवस्थापन सुधारणे यासारख्या स्वच्छ तंत्रज्ञान आणि पद्धतींचा अवलंब करण्यासाठी उद्योगांना प्रोत्साहन देणे महत्त्वाचे आहे. नागरिकांच्या अज्ञानामुळे प्रदूषणही वाढत असल्याने Air pollution प्रदूषण कमी करण्यात नागरिकही महत्त्वाची भूमिका बजावू शकतात.
 
 
सिव्हिक सेन्स नावाची एक गोष्ट आहे. घरातील कचरा आपण यंत्रणेच्या माध्यमातून बाहेर काढावा, पाणी प्रदूषित करू नये, सार्वजनिक पाणी व्यवस्थेबाबत जागरुक राहावे, विनाकारण वाहनांचे हॉर्न वाजवू नये, वेगाने वाहने चालविण्याऐवजी जास्त मायलेजनुसार वाहने चालवावीत. या सार्‍या गोष्टींचा अमल केल्यास आपण Air pollution प्रदूषण कमी करण्यासाठी हातभार लावू शकतो. एक व्यक्ती म्हणून आपल्याला कसे वागायचे, कसे जगायचे याचे स्वातंत्र्य निश्चितच आहे; पण आपल्या काही सामाजिक जबाबदार्‍या आहेत, ज्या पूर्ण निष्ठेने पार पाडल्या पाहिजेत. समाज म्हणजे आपण सगळे. आजचे प्रदूषण हे उद्याचे अस्वास्थ्य होय. येणार्‍या पिढ्यांसाठी चांगले वातावरण टिकवायचे असेल तर आपण स्वतःला तसेच आपल्या कुटुंबातील सदस्यांना आणि शेजार्‍यांना प्रदूषणाबाबत जागरूक केले पाहिजे. सरकार आपले काम करेल. पण लोकांनी सहकार्य आणि योगदान दिले पाहिजे.
 
हिंदी साप्ताहिक भारतवाणीहून साभार