तेलंगणा ‘मोफत’ संस्कृती स्वीकारणार की सत्शीलता?

    दिनांक :16-Nov-2023
Total Views |
वर्तमान
- सुरेश कोचाटील
Telangana Election : विधानसभा निवडणुकीत सर्वात तरुण राज्यातील मतदार फ्रीबी (‘मोफत’ची आश्वासने) संस्कृतीपासून दूर जाणार्‍या भारतीय जनता पार्टीला मते द्यायची की मतदारांना प्रलोभन दाखवून आकर्षित करणार्‍या आणि भ्रष्टाचाराने ग्रस्त काँग्रेस आणि बीआरएसला मते द्यायची याचा निर्णय घेणार आहेत.
 
 
Telangana Election : एक जुनी म्हण आहे, त्यानुसार एखाद्या माणसाला एक मासा द्या आणि तुम्ही त्याला एक दिवस खायला द्या. अथवा माणसाला मासे पकडायला शिकवा आणि त्याला आयुष्यभर खायला घाला. पण तेलंगणातील काँग्रेस आणि भारत राष्ट्र समितीची नवीन राजकीय म्हण आहे, जोपर्यंत मतदारांना सक्षमीकरण, कल्याणकारी योजना आणि फ‘ीबी (‘मोफत’ची आश्वासने) काय आहे ते समजत नाही, तोपर्यंत मतदाराला उद्यासाठी मत राखून ठेवण्याच्या अटीसह आज खायला द्या! गेल्या दोन टर्ममध्ये केसीआर (के चंद्रशेखर राव) आपली आश्वासने पूर्ण करण्यात अयशस्वी ठरल्याने, 30 नोव्हेंबर 2023 रोजी होणार्‍या राज्य विधानसभेच्या मतदानात हॅट्रिक करण्यासाठी ते पूर्णपणे नवीन चेहरा आणि फ्रीबी मॅनिफेस्टो घेऊन आले आहेत. पण केसीआर यांचे सत्तास्वप्न पूर्ण होऊ नये म्हणून सत्तेची भुकेली काँग‘ेस आणि शांत, सत्शील भारतीय जनता पक्ष यांच्या हालचाली सुरू आहेत.
 
Telangana Election
 
बीआरएसबद्दल असंतोष
गेल्या जवळपास दहा वर्षांपासून राज्याचे नेतृत्व करणार्‍या Telangana Election तेलंगणा राष्ट्र समितीचा नवा अवतार असलेल्या भारत राष्ट्र समितीमध्ये (बीआरएस) बंडखोरीची पहिली चिन्हे दिसू लागली आहेत. खालच्या स्तरावरील नगरसेवकांना आमदाकीची तिकिटे मिळत नसल्याने अर्थात त्यांच्यात श्रेणीसुधारत होत नसल्यामुळे, काम न करणार्‍या आमदारांना तिकिटांचे वाटप झाल्याने आणि तेलंगणातील सत्ताधारी कुटुंबाविरुद्ध होत असलेल्या सर्वव्यापी भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे केसीआरच्या सरकारच्या विरोधात मोठी सत्ताविरोधी लाट निर्माण झाली आहे. कर्नाटकात अनपेक्षित विजय मिळवणार्‍या काँग्रेसने बीआरएसमधील असंतुष्ट नेत्यांना भुरळ घालत निवणुकीत आक‘मक पद्धतीने पावले टाकायला प्रारंभ केला आहे.
 
 
दुसरीकडे भाजपने आपले पत्ते अजून उघड केलेले नाहीत. Telangana Election मतदानाच्या अवघ्या पाच आठवड्यांपूर्वी आपल्या उमेदवारांची यादी या पक्षाने जाहीर केली. शेवटच्या क्षणाच्या लाटेकडे पक्ष डोळे लावून बसलेला आहे, हे यातून स्पष्ट होते. राज्यातील 119 जागांसाठी चुरशीची लढत असून, केसीआरने आपल्या पक्षाला अर्ध्या क्रमांकाच्या जवळ आणण्याकडे लक्ष केंद्रीत केले आहे. त्याची मदार विश्वासू मित्र एआयएमआयएमवर आहे. ज्या पक्षाला मुस्लिमबहुल जुन्या हैदराबाद शहरात निश्चितपणे सात ते आठ जागांवर विजय मिळेल. साध्या बहुमताच्या पुढे जाण्यासाठी आकडा कमी पडला तर काँग्रेसच्या आमदारांना खरेदी करण्याचा फॉर्म्युला वापरला जाईल. 2014 मध्ये काँग्रेसचे चार आमदार टीआरएसच्या छावणीत गेले, तेव्हा त्यांनी याच पद्धतीचा अवलंब केला. 2018 मध्ये काँग्रेसच्या 18 पैकी 12 आमदारांनी टीआरएसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसला मतदान करणे हे बीआरएसला मतदान करण्यासारखेच आहे, हे पालुपद भाजपने लावून धरले आहे. यंदा निवडणुकीनंतर त्यांचे आमदार टीआरएसमध्ये जाणार नाहीत, असे वचन द्यावे, असे आव्हान भाजप काँग्रेसला देत आहे.
 
 
तेलंगणा Telangana Election काँग्रेसचे प्रमुख रेवंत रेड्डी यांनी प्रारंभीच्या दिवसात विद्यार्थी परिषदेचे काम केल्याची तसेच ते आरएसएसचा अजेंडा राबवत असल्याची कॅसेट बीआरएसने लावून धरलेली आहे. तेलंगणात मुस्लिम-ख्रिश्चन व्होटबँकेचा काही हिस्सा काँग्रेसला मतदान करण्याची शक्यता बघता त्यांना संभ्रमित करण्यासाठी बीआरएसतर्फे असा प्रचार हेतुपुरस्सर केला जात असल्याचे शेंबडा पोरगाही सांगेल. तिरंगी लढत झाल्यास राज्यातील मुस्लिम सुमारे 24 जागांवर तर ख्रिश्चन 40 जागांवर निर्णायक ठरू शकतात.
 
 
भाजपाची महाराष्ट्राच्या सीमेला लागून असलेल्या मतदारसंघांवर भिस्त आहे, जिथे पक्षाने चांगली कामगिरी बजावली आहे. भाजपाने 2019 च्या निवडणुकीत लोकसभेच्या करीमनगर, सिकंदराबाद, निजामाबाद आणि आदिलाबाद या जागांवर विजय मिळविला होता. लोकसभेच्या चार जागांचे विधानसभेच्या जागांमध्ये रूपांतर केल्यास त्यांची एकूण संख्या 28 जागांची होते. याच अंकगणितानुसार पक्ष कार्य करीत असला तरी प्रत्यक्षात अशा रूपांतरातून या जागा काबीज करणे, हे पक्षासाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे.
 
 
ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपाने 48 जागा जिंकून प्रशंसनीय कामगिरी बजावली होती. Telangana Election विधानसभा निवडणुकीसाठी बीआरएसचे उमेदवार, ज्यातील बहुतांश विद्यमान आमदार आहेत, त्यांनी स्वतःला प्रचारात झोकून दिले आहे. पण, तुलनेने नव‘या भाजप उमेदवारांना कदाचित प्रचारासाठी पुरेसा वेळ मिळाला नसावा, त्यामुळे राज्यभरात प्रचाराच्या रणधुमाळीसाठी त्यांना केंद्रीय मंत्री आणि नजीकच्या राज्यातील वरिष्ठ नेत्यांना आमंत्रित करावे लागणार आहे. तिन्ही प्रमुख राजकीय पक्षांकडून भ्रष्टाचाराच्या आरोपांची फैरी सुरू असतानाच जाहीरनाम्यांचा हंगाम सुरू झाला आहे. मतदारांना भुरळ घालण्यासाठी बीआरएस आणि काँग्रेसने मोफत लाभ योजनांची लांबलचक यादी तयार केली आहे.
 
 
दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी किंवा समाजातील गरजू आणि गरिबांना सक्षम करण्याच्या योजनांसाठी राज्याच्या तिजोरीत सध्या थोडासाच पैसा शिल्लक आहे. जाहीरनाम्यांमध्ये आरोग्यसेवा, Telangana Election पायाभूत सुविधांचा दर्जा वाढविण्याबाबत आश्वासने दिली जात असली तरी, प्राथमिक आरोग्य केंद्रे, आयुष केंद्रे तसेच रुग्णवाहिकांचा दर्जा सुधारण्यासाठी बहुतांश निधी केंद्र सरकारकडून राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत पुरविला जातो आहे, याकडे दुर्लक्ष से करता येईल?
 
 
काँग्रेसची हमी
काँग्रेसने तेलंगणासाठी जारी केलेल्या जाहीरनाम्यात कर्नाटक मॉडेलची पुनरावृत्ती करण्याचा प्रयत्न केला आहे. दारिद्र्य रेषेखालील महिलांना मासिक 2500 रुपये, 500 रुपयात एलपीजी सिलेंडर, महिलांसाठी मोफत बस प्रवास, सर्व ग्राहकांना 200 युनिट मोफत वीज, ज्येष्ठ नागरिकांसाठी 4 हजार रुपयांची मासिक पेन्शन आणि 10 लाख रुपये राजीव आरोग्यश्री विमा योजनेसाठी, अशा सहा आश्वासनांची हमी काँग्रेसने मतदारांना दिली आहे.
 
 
बीआरएसचा जाहीरनामा
बीआरएसने Telangana Election राज्यात बीपीएल परिवार म्हणून नोंदणीकृत असलेल्या 93 लाख कुटुंबांवर लक्ष केंद्रीत केले आहे. 5 लाखांपर्यंतचा विमा, अन्नपूर्णा योजना, सध्याची भरड तांदूळ योजना बदलून उत्तम तांदूळ योजना, सौभाग्यलक्ष्मी योजना, सर्व गरीब महिलांना दरमहा 3 हजार रुपये आणि एलपीजी सिलेंडरसाठी 400 रुपये, अशी आश्वासने दिली आहेत.
 
 
मोफत संस्कृतीपासून दूर रहा
भाजपने अद्याप आपला जाहीरनामा जारी केलेला नसला तरी पक्षाने सूचित केले आहे की, आम्ही काँग्रेस आणि बीआरएसप्रमाणे फ्रीबी (मोफतची आश्वासने) शर्यतीत उतरणार नाही. 2019 च्या Telangana Election लोकसभा निवडणुकीपूर्वी काढलेल्या त्याच्या मागील जाहीरनाम्यानुसार पक्षाची तेलंगणा शाखा आपल्या जाहीरनाम्यातील प्रमुख मुद्यांची पुनर्मांडणी करण्याचा प्रयत्न करू शकते. एकंदरीत तेलंगणातील आगामी निवडणुकीनंतर बीआरएस तिसर्‍या टर्मसाठी कायम राहील की काँग्रेस कर्नाटकच्या पलीकडे दक्षिणेकडील सीमा वाढवण्याचा प्रयत्न करेल, हे ठरवण्यासाठीचा एक बेचमार्क राहणार आहे. दुसरीकडे काँग्रेस किंवा बीआरएस यापैकी कोणीही आमदारांच्या सं‘येचा अर्धा टप्पा ओलांडू शकले नाही तर भाजपाकडे किंग मेकरची भूमिका चालून येऊ शकते.
 
 
याशिवाय केसीआर यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. त्यांची मुलगी कविता हिचे नाव दिल्ली दारू घोटाळ्यात आले आहे. मुलगा केटीआर वडिलांची जागा घेण्याच्या प्रयत्नात असून, जावई हरीश राव सुरक्षित खेळी करून, मतदारांवर प्रभाव टाकत आहेत. बीआरएसच्या सत्तेविरुद्धचा जो प्रवाह आहे, तो प्रत्येक मतदारसंघानुसार किंवा उमेदवारांनुसार भिन्न आहेे. त्यानंतर जात आणि समुदायावर आधारित मतदान आहे, ज्याचा पक्षाच्या अंतिम संख्येत मोठा वाटा असतो. Telangana Election बीआरएस उमेदवारांच्या यादीवर एकवार नजर टाकली तर त्यात रेड्डी आणि वेलामा समुदायातील अनेक उमेदवारांचा भरणा दिसून येतो. मात्र एलेक्टिव्ह मेरिटच्या नावावर हे सारे खपवण्याचा प्रयत्न सुरू आहे. काँग्रेस जात सर्वेक्षणाचा ढोल बडवत आहे. पक्ष नेतृत्वाच्या अपेक्षा खूप जास्त आहेत, परंतु या राज्यात पक्षाला मते मिळण्याची शक्यता नाही. अल्पसं‘यक व्होट बँक हा आणखी एक स्विंग फॅक्टर असेल आणि एमआयएमने बीआरएसशी जुळवून घेतल्याने काँग्रेस पक्षाची गणिते बिघडू शकतात. बीआरएसला अस्वस्थ करण्यात काँग्रेस पक्षाने घेतलेल्या तथाकथित आघाडीच्या पुढे भाजप जाऊ शकतो की नाही, हे शेवटच्या दोन आठवड्यांच्या प्रचारावरून ठरणार आहे. तसे होण्यासाठी भाजपला अतिशय लक्ष्यकेंद्रीत आणि आक्रमक रहावे लागणार आहे. दक्षिणेकडील दुसर्‍या राज्यात आपली ताकद दाखवून द्यायची असेल तर भाजपला योजनाबद्ध रीतीने प्रचार मोहीम राबवावी लागेल.
 
ऑर्गनायझरहून साभार