हिंदू सणांविरुद्ध एवढा आक्षेप का?

    दिनांक :16-Nov-2023
Total Views |
दृष्टिक्षेप
 
 
- पंकज जगन्नाथ जयस्वाल
 
Hindu festival : हिंदू सणांना विरोध करणे, त्याबद्दल आक्षेप घेणे यामागे हिंदू धर्मातील जातींना विभाजित करून, व्होट बँकेचे राजकारण करणे, धर्मांतराच्या रॅकेटला मदत करणे तसेच तरुणांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडकवणे, हा काही राजकीय पक्ष आणि सेलिब्रिटींचा स्वार्थी अजेंडा आणि हेतू आहे. त्यापासून सावध राहण्याची गरज आहे. सणांमुळे समाजातील मध्यमवर्गीय आणि निम्नमध्यमवगीर्र्य लोकांच्या उदरनिर्वाहाची काळजी वाहिली जाते आणि देशाचे अर्थकारण झपाट्याने वाढवण्याचे ते महत्त्वाची भूमिका बजावतात, ही बाब ध्यानात घेतली पाहिजे. व्यक्तींमध्ये आणि समाजात एकोपा, प्रेम, सहिष्णुता, बंधुभाव वाढविण्याचे कामही सणांच्या माध्यमातून पूर्वापार होत आलेले आहे.
 
 
Hindu festival : प्रत्येक धर्मात वर्षभर विविध सण साजरे करण्याची पूर्वापार चालत आलेली परंपरा आहे. हिंदू धर्माचे अनुयायी देखील वर्षभर सण साजरे करतात. मु‘य फरक असा आहे की, हिंदू सणांना भक्कम वैज्ञानिक पुराव्यांचा आधार असून, ते भारतीय अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून ओळखले जातात. हिंदूंच्या पूर्वजांनी सणांची रचनाच अशा प्रकारे केली आहे की, त्यांचा शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो, तसेच त्यातून पर्यावरणाचे संगोपन आणि संतुलन साधले जाते. अनेक पाश्चात्य शास्त्रज्ञांनी हिंदू सणांच्या वैज्ञानिक पैलूंचा अभ्यास केला आहे तसेच एकंदरीतच समाज आणि पर्यावरणासाठी हिंदू सणांचे महत्त्व स्पष्टपणे अधोरेखित केले आहे.
 
Hindu festival
 
तथापि, काही संघटना, राजकीय पक्ष आणि सेलिबि‘टींचा अजेंडा निराळा आहे. जेव्हा Hindu festival हिंदूंचे सण तोंडावर येतात तेव्हा ते विभिन्न मुद्दे उपस्थित करून, त्या सणांच्या प्रथा-परंपरांसह त्यांच्या औचित्याबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित करतात. अज्ञान हे त्याचे कारण असू शकते, किंवा जे दिवसाचे 24 तास अन् आठवड्याचे सातही दिवस हिंदू संस्कृतीच्या विरोधात काम करीत आहेत, अशा एखाद्या व्यक्ती अथवा संस्थांचा अजेंडा पूर्ण करण्यासाठी ते असे काम करत असू शकतात.
 
 
सर्वात अलीकडील मुद्दा म्हणजे दीपोत्सवाच्या वेळी फटाक्यांच्या वापराला विरोध. अनेक राजकीय नेते आणि सेलिबि‘टींनी फटाके फोडल्याने प्रदूषणाची पातळी वाढते, असा अपप्रचार दिवाळीपूर्वीच सुरू करून दिला. हे लोक आणि पक्ष वर्षभर विभिन्न माध्यमातून होणार्‍या प्रचंड प्रदूषणाबाबत बेफिकीर असतात. त्यांनी याबाबत काही उपाय सुचवले आहेत का किंवा प्रदूषणाच्या पातळीबद्दल कधी चिंता व्यक्त केली आहे का? विविध सण लाखो भारतीयांसाठी उदरभरणाचे, रोजी-रोटीचे साधन आहेत. हे लोक सणांवर निर्भर असलेल्या लोकांच्या कल्याणाबद्दल, उत्थानाबद्दल इतके बेफिकीर आहेत का? सण हे आर्थिक वाढीचे प्रमुख घटक आहेत; या सणांना आळा घालण्यासाठी न्यायालयीन व्यवस्थेला विरोध करून आणि याचिका दाखल करून, यांना अर्थव्यवस्थेला खिंडार पाडायचे आहे का?
 
 
समाजातील सर्व जाती बांधवांना एकत्र आणणार्‍या, जीवन आणि पर्यावरण साजरे करणार्‍या, आनंद आणि उत्साह वाढवणार्‍या, महसूल वाढवणार्‍या आणि एकूण अर्थव्यवस्थेत मूल्य वाढवणार्‍या Hindu festival हिंदू संस्कृतीचा अपमान करणे हा त्यांचा मुख्य अजेंडा आहे. हिंदू धर्मातील जातींना विभाजित करून, व्होट बँकेचे राजकारण करणे, धर्मांतराच्या रॅकेटला मदत करणे तसेच तरुणांना अंमली पदार्थांच्या विळ‘यात अडकवणे, हा काही राजकीय पक्ष आणि सेलिब्रिटींचा स्वार्थी अजेंडा आणि हेतू आहे.
 
 
या लोकांनी निर्माण केलेल्या चुकीच्या प्रचाराची जाणीव होण्यासाठी दीपोत्सवाबाबतची वस्तुस्थिती काय आहे, हे जवळून पाहिले पाहिजे. दिवाळीत साधारणतः फटाके 2 ते 3 दिवस फोडले जातात, त्यातल्या त्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी जास्त तीव‘तेने फटाके फोडले जातात. एकूण प्रदूषणाच्या टक्केवारील फटाक्यांच्या या प्रदूषणाचा वाटा फक्त 4 ते 5 टक्के आहे. तज्ज्ञांचा अभ्यास आणि विश्लेषणानुसार, प्रदूषणाची मु‘य कारणे म्हणजे पराली जाळणे (शेतीतील धान आणि इतर कचरा), वाहनांचे प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण आणि बांधकाम उद्योग ही आहेत. या Hindu festival घटकांमुळे जवळपास 95 टक्के प्रदूषण होते, पण किती लोक त्याबद्दल चिंता व्यक्त करीत आहेत आणि ते कमी करण्यासाठी किती लोक पुढाकार घेत आहेत ? यापैकी कोणत्याही सेलिबि‘टींनी प्रदूषणाबाबत जनजागृती केली आहे का ? वाहनांचे प्रदूषण कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करणे ही त्यांची जबाबदारी नाही का? हे त्यांच्या अनुयायांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास प्रोत्साहित करीत आहेत का?
 
 
सण बाजाराला सकारात्मक दृष्टीकोन देतात. या Hindu festival दिवाळीत एकूण खरेदी 1.25 ट्रिलियनने जास्त झाली; कोरोनाच्या परिणामानंतर एकूण अर्थव्यवस्था रुळावर आणण्यासाठी अशा खरेदीची बाजाराला नितांत गरज होती. अनेक भारतीय कुटुंबे उदरनिर्वाहासाठी सणांवर अवलंबून असतात; सण साजरे करण्यासाठी समाज जितका उत्साही असेल, तितकीच मध्यम आणि नव-मध्यमवर्गीय कुटुंबांना त्यांची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्याची शक्ती मिळेल आणि त्यामुळे अर्थव्यवस्था मजबूत होईल. राजकीय पक्ष आणि सेलिब‘ेटींनी त्यांचा अजेंडा बाजूला ठेवला पाहिजे. ही बाब देखील त्यांनी ध्यानात घ्यायला हवी की, त्यांनी त्यांच्या आयुष्यात जे काही साध्य केले आहे, ते त्यांच्या उदयात सामान्य लोकांनी त्यांना साथ दिल्याने शक्य झाले आहे. या पृष्ठभूमीवर सामान्य लोकांना त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत करणे, ही त्यांची जबाबदारी नाही का?
 
 
हिंदू विधी आणि Hindu festival सणांमधील पूजा करण्याच्या पद्धती कोणत्याही व्यक्ती, समूह, धर्म किंवा पर्यावरणाबद्दल कधीही द्वेष किंवा वाईट भावनांना प्रोत्साहन देत नाहीत. उलट निरनिराळ्या विधींद्वारे प्रत्येकाच्या कल्याणासाठी प्रार्थना केली जाते. प्रत्येक विधीद्वारे शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर होणार्‍या सकारात्मक परिणामांचा, संकटांना तोंड देण्याच्या सामर्थ्याच्या विकासाचा, समाजातील विविध घटकांमध्ये सामंजस्य कसे निर्माण होईल याचा आणि मादक पदार्थांशिवाय जीवन जगण्याच्या पद्धतीचा अवलंब करण्याचा काळजीपूर्वक विचार केला जातो. जीवन म्हणजे उत्साह आणि प्रेमाचा खळखळता प्रवाह आहे, हे ओळखणे हेच सण साजरे करण्याचे अंतिम ध्येय आहे.
 
 
हिंदू संस्कृती Hindu festival नष्ट करण्याचा जेवढा प्रयत्न कराल, तितके अंमली पदार्थांचे सेवन, बेकायदेशीर कामे, हिंसाचार, महिलांवरील अत्याचार आणि भ्रष्ट मानसिकता वाढेल. याचे साधे कारण म्हणजे हिंदू संस्कृती प्रत्येक व्यक्ती, समाज, पर्यावरण, देश आणि जगाच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून, या संस्कृतीत शांततापूर्ण जीवन जगण्यासाठी नैतिक मूल्ये आणि जीवनाचा उद्देश याची शिकवण दिली जाते. विशिष्ट सणाच्या वेळी लाखो जनावरांची कत्तल करणे कुणाला मान्य आहे का? संशोधन आणि विश्लेषणातून हे स्पष्ट झाले आहे की, अशा लाखो जनावरांच्या कत्तलीमुळे माती, पाणी आणि वायू प्रदूषणावर परिणाम होतो. परंतु हिंदू सणांवर आक्षेप घेणारे लोक तेव्हा कोणत्याही धार्मिक रीतिरिवाजाबाबत आक्षेप घेत नाहीत. यावरून हिंदू धर्म आणि हिंदू सणांच्या बाबतीतला पक्षपाती अजेंडा स्पष्टपणे दिसून येतो. तथाकथित पर्यावरणवादी आणि समाजसुधारक (राजकीय नेते आणि सेलिबि‘टी) यांच्या अशा दुटप्पीपणाचा तीव‘ निषेध केला पाहिजे.
 
 
ऑर्गनायझरहून साभार