इतस्तत:
- डॉ. विवेक राजे
मागील काही दिवसांपासून पाकिस्तानच्या सीमेलगत असलेल्या ‘तोरखाम’ आणि ‘चमन’ या दोन ठिकाणी लाखो अफगाण नागरिक जमा झालेले आहेत. हे अफगाण नागरिक problem of foreigners पाकिस्तानात अवैधरीत्या राहात होते. जवळजवळ 17 लाख अफगाणी नागरिक पाकिस्तानात विनापरवाना राहात आहेत. हे सगळे अफगाणी घुसखोर परत अफगाणिस्तानात पाठविण्याचा पाकिस्तान सरकार प्रयत्न करते आहे. त्यामुळे हजारो ट्रक भरून हे अफगाणी स्त्री-पुरुष, मुले-वृद्ध या दोन सीमांच्या जवळ पाठविण्यात येत आहेत असे म्हणतात.
problem of foreigners : मागील महिन्यात पॅलेस्टाईनने इस्रायलवर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा परिणाम म्हणून सुरू झालेल्या युद्धात इस्रायलने गाझा पट्टी बेचिराख करायला सुरुवात केली. हजारो पॅलेस्टाईन नागरिक जीव वाचवण्यासाठी शेजारच्या देशांमध्ये आश्रय मागत आहेत. परंतु एकही शेजारी देश एकाही पॅलेस्टाईन नागरिकाला आपल्या देशात आश्रय देण्यास तयार नाही. वास्तविक हे सगळे अरबी मुस्लिम देश आहेत. हे सगळे देश जमेल त्या मार्गाने, जमेल त्या प्रकारे पॅलेस्टाईनला मदत करीत असतात. पण पॅलेस्टाईन नागरिक आपल्या देशात घेण्यास कोणीही तयार नाहीत. अमेरिकन अर्थव्यवस्था वास्तवात परकीय नागरिकांवर अवलंबून आहे. परंतु एकदा त्या परदेशी माणसाचा व्हिसा-परवाना संपला की, त्या माणसाला सरळ त्याच्या देशात परत पाठविण्याची अत्यंत कडक कारवाई करण्यात येते, हे भारतातील सर्वसामान्य माणसालादेखील चांगलेच माहीत आहे. याच प्रकारचे कायदे आणि व्यवस्था युरोपातील देशांमध्ये अस्तित्वात आहे आणि अतिशय परिणामकारकपणे ती अंमलात आणली जाते, हे सर्वश्रुत आहे. अवैध मार्गाने अमेरिकेत घुसणार्या घुसखोरांना अमेरिकी प्रशासन कोणतीही दयामाया दाखवत नाही आणि रीतसर आश्रय मागणार्यांपैकी जेमतेम एक टक्काच लोकांना अमेरिका सामावून घेते, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच या परिस्थितीचा भारतात गंभीरपणे विचार करण्याची गरज आहे.
साधारणपणे पाच-सात वर्षांपूर्वी म्यानमारमधून अनेक रोहिंग्या मुसलमान भारतात आश्रयाला आले होते. या problem of foreigners रोहिंग्या मुसलमानांना त्यांच्या देशात परत पाठविण्याचा सरकार विचार करीत होते. बांगलादेशी मुसलमान तर सगळ्या देशभरात पसरले आहेत. अनेक पाकिस्तानी नागरिक भारतात येतात आणि परत त्यांच्या देशात न जाता इथेच गडप होऊन जातात. अनेक अफगाणी नागरिक या देशात स्थायिक होताना दिसतात. आज भारतात मुस्लिम लोकसंख्या या देशाच्या लोकसंख्येच्या 20 टक्क्यांच्या आसपास आहे. त्यात ही बांगलादेशी आणि रोहिंग्या मुसलमानांची भर पडताना दिसते आहे. यांचा देशाच्या संसाधनांवर ताण पडतोच आहे. पुन्हा सर्वच मुस्लिम समाज हा लोकसंख्या नियंत्रणात ठेवणे किंवा दोनच मुलांना जन्माला घालणे यांसारख्या गोष्टींची अजिबात दखल घेताना दिसत नाही. सर्वसाधारणपणे सुशिक्षित हिंदू जोडपे दोन मुलांवर थांबताना दिसते. अनेक सधन जोडपी तर ‘एकच मूल’ या संकल्पनेवर स्थिर आहेत; मात्र सर्वसाधारणपणे सुशिक्षित आणि सधन मुस्लिम जोडपे किमान चार मुलांना जन्माला घालताना दिसतात. जिथे सुशिक्षित किमान चार मुलं जन्माला घालतात तिथे अनेक अशिक्षित मुसलमानांमध्ये हीच संख्या सहजपणे दुप्पट होताना दिसते. या पृष्ठभूमीवर एन.आर.सी. किंवा सी.ए.ए. अत्यंत महत्त्वपूर्ण ठरते. जर मुस्लिम राष्ट्र दुसर्या मुस्लिम राष्ट्रातील मुस्लिम नागरिकांना आपल्या भूमीवर थारा देत नसतील तर इतर राष्ट्रांनी त्यांना आश्रय का द्यावा, याचे एकही योग्य कारण आज तरी कोणालाही देता येत नाही. जॉर्डन, इजिप्त, लेबनॉन, सीरिया यांसारखे इस्लामिक देश इतर देशांतील आणि विशेषतः गाझा पट्टीतील पॅलेस्टाईन मुसलमानांना आपल्यात सामावून घेण्यास असमर्थ असतील तर रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांना हिंदुबहुल असलेल्या आणि लोकसंख्येचा विस्फोट झाल्यासारखी स्थिती असलेल्या भारताने आपल्यात सामावून घ्यावे, ही अपेक्षाच अवाजवीरीत्या गैरलागू होते. जगभरातील सरकारांना डोकेदुखी ठरलेल्या मुसलमान समाजाला भारताने आधीच आपल्या भूमीचे विभाजन करून एक मोठा जमिनीचा तुकडा स्वतंत्र देश म्हणून दिलेला आहे. दुर्दैवाने भारतातील साम्यवादी आणि काँग्रेस विचारधारा हे कधीच लक्षात घेत नाहीत. मुळातच हा सगळा झगडा अधिकाधिक जमिनीवर आपला मालकी हक्क ठेवण्याचा आहे. जगातील कोणताही समाज अथवा प्रदेश आपल्या प्रभावाखाली आणायचा असेल, जर विभिन्न धर्मीय समाज आपल्या बरोबर घ्यायचा असेल, तर त्या समाजाची मानसिकता आधी समजून घेणे आवश्यक असते. जगभरातील मुस्लिम समाजाची मानसिकता समजून घेण्यात आम्ही सातत्याने कमी पडतो आहोत. मुस्लिम समाज हा आपसात लढत असला, एकमेकांवर कुरघोडी करणारा असला, तरी नवनवीन जमीन आपल्या आधिपत्याखाली आणणे, इतरांचे धर्मांतर करून आपली लोकसंख्या वाढविणे आणि या सगळ्या प्रक्रियेत त्या इतर धर्मीयांवर अनन्वित अत्याचार करणे, त्या अत्याचारांचा विकृत आनंद घेणे ही या समाजाची सर्वदूर मानसिकता आहे.
problem of foreigners : मुस्लिम समाजाची ही मानसिकता डॉ. बाबासाहेब आंबेडकर अत्यंत चांगल्या प्रकारे ओळखून होते. त्यामुळे फाळणीच्या वेळी संपूर्ण लोकसंख्येची अदलाबदल करा, असा सल्ला त्यांनी दिला होता. पण त्या बहुमोल सल्ल्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. हिंदू-मुस्लिम ऐक्याचे गोडवे गाणारे गांधी-नेहरूंचे नेतृत्व असो वा पाकिस्तानपासून बांगलादेश वेगळा करणारे इंदिरा गांधींचे नेतृत्व असो वा सुसंस्कृत भारतीय समाज असो; मुस्लिम समाजाची मानसिकता ओळखण्यात सातत्याने कमीच पडला, असेच म्हणावे लागते. आजही मुस्लिम देशच पॅलेस्टाईन निर्वासितांना सामावून घेण्यास नकार देताना दिसतात. युरोपातील देश या मुद्यावर ‘वेट अॅण्ड वॉच’ हे धोरण अवलंबताना दिसतात. जगभरातील अत्यंत प्रभावशाली आणि मोक्याच्या जागांवर बसलेले ज्यू समाजातील लोक हे याचे एक कारण असले, तरी आज या एकारलेल्या मुस्लिम धर्मीयांमुळे सगळे जगच त्रस्त झाले आहे, ही वस्तुस्थिती नजरेआड करता येत नाही. फक्त भारतातील काही तथाकथित विद्वानांना हे दिसत नाही, असेच म्हणावे लागते. विचारधारा वेगवेगळ्या असल्या, तरी जगातील इतर कोणत्याही देशातील राजकीय पक्ष, विद्वान विचारवंत, समाजातील अग्रगण्य लोक राष्ट्रहित नजरेआड करताना दिसत नाहीत. आमच्या देशात मात्र देशाच्या पंतप्रधानांनी राष्ट्रहिताचा विचार करून इस्रायलला पाठिंबा दिल्यानंतरही देशातील दुसर्या क्रमांकाचा असलेला काँग्रेस पक्ष मात्र पॅलेस्टाईन हमासला पाठिंबा जाहीर करण्यात धन्यता मानतो. परकीयांशी लढताना आम्ही 105 आणि आपसात जेव्हा खटाखटी असतील तेव्हा 100 विरुद्ध 5 हे आमच्याच आदर्श ग्रंथांनी मांडलेले तत्त्वज्ञान आमच्याऐवजी मुस्लिम समाज आज अधिक परिणामकारकपणाने आचरणात आणताना दिसतो आहे. आपल्या देशातील राजकीय पक्ष मात्र सतत फक्त आणि फक्त राजकीय विरोधाचाच विचार करताना दिसतात. त्यांना राष्ट्रहितापेक्षा पक्षीय स्वार्थ महत्त्वपूर्ण वाटतो. पाकिस्तान युद्धाच्या वेळी वा राष्ट्रीय आपत्तीच्या वेळी सत्ताधारी काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभे राहण्याचा आदर्श भाजपाने अनेकदा घालून दिलेला असतानाही, सत्तेच्या भुकेल्या असलेल्या आजच्या काँग्रेस पक्षाला मात्र या आदर्शांची कोणतीही चाड राहिलेली नाही.
problem of foreigners ; या पृष्ठभूमीवर सर्वसामान्य जनतेला, सामान्य माणसाला, वेगळा विचार करण्याची आवश्यकता आहे. आमचा समाज अनेक बाबतीत अतिशय संवेदनशील आहे. उदाहरणार्थ, काल-परवा मराठा आरक्षण आंदोलनाच्या व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि शरद पवारांचे विश्वासू जितेंद्र आव्हाड यांना मनाई केली गेली. त्यानंतर आव्हाडांना तेथून निघून जावे लागले. शाहीनबाग आंदोलन चालू असताना अनेक पत्रकारांनादेखील तिथे प्रवेश देण्यात आला नव्हता. आमच्याच देशातील अनेक समस्यांच्या बाबतीत भारतीय समाज किती संवेदनशील असतो, याचे हे उदाहरण आहे. देशापुढील समस्यांच्या बाबतीत मात्र हाच समाज संवेदना गमावून बसलेला दिसतो. फक्त आपल्या पायाखाली पाहण्याची ही भारतीय समाजाची मानसिकता होय. आज कधी नव्हे ते भारतीय समाजाने काही बाबतीत अधिक संवेदनशील होणे आणि व्यक्त होणे आवश्यक झाले आहे.
- 9881242224