आरटीओ पासिंगकरिता डबल डेकर धुळखात

17 Nov 2023 16:15:50
नागपूर, 
Double decker Bus : वातानुकूलित इलेक्ट्रिक डबल डेकर बसचे लोकार्पण 16 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. मात्र प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून पासिंग न मिळाल्याने डबल डेकर धुळखात आहे. ज्येष्ठ नागरिकांना निःशुल्क धार्मिक पर्यटन घडविण्यासाठी डबल डेकर बस उपलब्ध करून देण्यात आली होती. ज्येष्ठ नागरिकांसाठी सध्या उपलब्ध असलेल्या इलेक्ट्रिक बसचा 7 हजार ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे. माजी खासदार दत्ता मेघे यांच्या संकल्पनेतून स्थापन करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठानकडून 2 डबल डेकर बस Double decker Bus उपलब्ध करून देण्यात आल्या आहे.
 
Double decker Bus
 
आरटीओकडून ब्रेक
नागपूरच्या रस्त्यांवर फिरण्यासाठी डबल डेकरला Double decker Bus आरटीओकडून पासिंग मिळणे आवश्यक आहे.सर्व सुविधायुक्त अशी डबर डेकर बसला आरटीओकडून ब्रेक लागल्याने ही बस प्रतिक्षेत आहे. फार पूर्वी नागपूरच्या रस्त्यांवर डबल डेकर बस धावत होती. कालांतराने ही बस बंद झाली. ज्येष्ठ नागरिकांच्या पर्यटनासाठी ही बस सुरू होत असल्याने अनेकांनी आनंद व्यक्त केला होता. डबल डेकर बसचे कुतूहल कायम असल्याने ही बस सुरू झाल्यास पर्यटनांचा वेगळा आनंद मिळणार आहे.
 
 
धार्मिकस्थळांची सहल
नितीन गडकरींच्या संकल्पनेतून साकारलेल्या आणि ज्येष्ठ नागरिक प्रतिष्ठान, नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार बसची आसन क्षमता 65 आहे. सध्या 1 इलेक्ट्रिक बस सेवेत असून या Double decker Bus बसच्या माध्यमातून शेगाव, माहूर, कळंब, अंभोरा, आदासा, धापेवाडा आदी धार्मिकस्थळांच्या निशुल्क सहलीचा लाभ ज्येष्ठ नागरिक घेत आहे. सध्या या बसला 3 ते 4 महिन्यांची प्रतीक्षा यादी असल्याने डबल डेकर बस सुरु करण्याची गरज आहे.
Powered By Sangraha 9.0