रायपूर,
IED blast during polling छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळपासूनच लोकांचा मतदानाकडे कल दिसून येत आहे. मतदानादरम्यान धमतरी येथे नक्षलवादी हल्ला झाला. नक्षलवाद्यांनी सीआरपीएफच्या टीमवर आयईडीचा स्फोट केला आहे. नक्षलवाद्यांनी दुचाकीवरून जाणाऱ्या दोन जवानांना लक्ष्य केले. या हल्ल्यातून दोन्ही जवान थोडक्यात बचावले.
यापूर्वी गुरुवारी नक्षलवाद्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याची घोषणा केली होती. त्यामुळे काही संवेदनशील मतदान केंद्रांची सुरक्षाही वाढवण्यात आली होती. IED blast during polling नक्षलवाद्यांनी आयईडीचा स्फोट करून जवानांना इजा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन्ही जवान सुखरूप आहेत. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अतिरिक्त फौजफाटा पाठवण्यात आला आहे.