तभा वृत्तसेवा
यवतमाळ,
Krantiveer Lahuji Salve : लहुजी साळवे सेवा निवृत्त कर्मचारी बहुउद्देशीय संस्था, यवतमाळच्या वतीने सेलिब्रेशन हॉल अँन्ड ट्रेनिंग सेंटर (बचत भवन) मेडिकल चौक, यवतमाळ येथे क्रांतिवीर लहुजी साळवे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. परिस्थिती माणसाला घडवीत असते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर लहुजी साळवे, मुक्ता साळवे, अण्णाभाऊ साठे यांना परिस्थितीने घडविले आहे. या महापुरुषांचे विचार समाजातील तळागाळातील माणसापर्यंत पोहोचविणे हे समाजातील कार्यकर्त्यांची सामाजिक जबाबदारी आहे.
तमाम महापुरुषांच्या विचारांचा अंगीकार केल्यास समाज वैचारिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक तसेच आर्थिकदृष्ट्या सक्षम होईल, असे प्रतिपादन प्रमुख वक्ते कांबळे यांनी केले. Krantiveer Lahuji Salve कार्यक्रमाच्या प्रारंभी लहुजी साळवे यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून हारार्पण करण्यात आले. याप्रसंगी व्यासपिठावर साहेबराव खडसे, माणिक खडसे, कांबळे, प्रा. डॉ. चंद्रशेखर कासार, विनोद बोरकर, प्रा. डॉ. बाळकृष्ण सरकटे, ओंकेश्वर हिवराळे यांची उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी डॉ. चंद्रशेखर कासार युवकांना मार्गदर्शन करताना म्हणाले, आत्मविश्वास हा यशोमंदिराचा पाया आहे. जिद्द, चिकाटी, परिश्रम आणि अभ्यासू वृत्तीमुळे आत्मविश्वास निर्माण होतो. त्यासाठी पालकांनी मुलांना त्यांच्या आवडीचे क्षेत्र निवडण्याचे स्वातंत्र्य द्यावे. उद्योग- व्यवसाय वा नोकरी या Krantiveer Lahuji Salve क्षेत्राची निवड युवकांनी स्वतः करावी. आवडीचे क्षेत्र निवडले तर तरुण निश्चितच प्रगती करतील. विनोद बोरकर यांनी स्पर्धेच्या युगात युवकांनी जिद्दीने अभ्यास केला तर ते चांगल्या पदावर जाऊ शकतात. त्यासाठी त्यांनी त्या मार्गाने वाटचाल करावी. तसेच व्यवसाय आणि नोकरी यातील फरक त्यांनी विशद केला. कार्यक‘माचे अध्यक्ष साहेबराव खडसे तर उद्घाटक माणिकराव खडसे होते. कार्यक‘माचे प्रास्ताविक डॉ. बाळकृष्ण सरकटे यांनी केले. संचालन ओंकेश्वर हिवराळे यांनी तर आभार ज्ञानेश्वर खंडारे यांनी मानले.
याप्रसंगी Krantiveer Lahuji Salve मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. भोजनदाते नंदकुमार वानखडे यांचाही सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी डॉ. सरकटे, हिवराळे, तुळशीराम गवळी, अजाबराव रणखांब, ज्ञानेश्वर खंडारे, भुजंगराव जोगदंड, माला खंडारे, शालिनी पडघान, अनुसया पडघान, नलिनी पडघान, वंदना खडसे, पुष्पा तेलंगे, छबु ससाने, मधुकर तेलंगे, लक्ष्मण वानखडे, अशोक बावणे, देविदास उबाळे, नामदेव इंगोले, महादेव थोरात, दशरथ शेजुळकर व लहुजी साळवे सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेच्या सभासदांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला पुसद, नेर, दारव्हा आणि यवतमाळ नगरीतील बहुसं‘य समाज बांधवांची उपस्थिती लाभली होती.