एमपीएससीच्या मुलाखती 30 नोव्हेंबरपासून

17 Nov 2023 16:19:54
नागपूर,
MPSC Exam : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा निकाल आयोगाने जाहीर केला आहे.परीक्षेच्या निकालाच्या आधारे मुलाखतीस अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती 30 नोव्हेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत होणार आहेत. एमपीएससीच्या मुख्यपरीक्षेत 1 हजार 954 उमेदवार पात्र ठरले आहेत.
 
MPSC Exam
 
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे MPSC Exam घेण्यात आलेल्या राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 च्या लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला होता. महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2022 ही 21 ऑगस्ट 2022 रोजी 37 केंद्रांवर ही परीक्षा घेण्यात आली होती. त्यात उपजिल्हाधिकारी, पोलिस उपअधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी इत्यादी पदांचा समावेश होता. एक वर्षानंतर परीक्षेस पात्र ठरलेल्या उमेदवारांची मुख्य परीक्षा ऑक्टोबर मध्ये घेण्यात आली. आयोगाने 19 ऑक्टोबर रोजी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर केला. आता त्यासाठी मुलाखतीची प्रक्रिया 30 नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. एका दिवशी दहा उमेदवारांच्या मुलाखती होणार आहे. मुख्य परीक्षेत पुणे विभागातून 1 हजार 346, औरंगाबाद 210, नाशिक 133, मुंबई 121, नागपूर 86, अमरावती 58 उमेदवार उत्तीर्ण झाले. शहरातील 86 विद्यार्थी उत्तीर्ण नागपूर शहरातून परीक्षा देणार्‍यापैकी 86 उमेदवार मुख्यपरीक्षेत पात्र ठरले आहेत.
 
 
मुख्य परीक्षा जानेवारीपासून
राज्यसेवा परीक्षा 2023 मधील विविध संवर्गाचा निकाल 6 सप्टेंबर रोजी जाहीर करण्यात आला. MPSC Exam विद्यार्थ्यांना 21 नोव्हेंबरपर्यंत अर्ज करता येणार आहे. त्यानुसार विद्यार्थ्यांची पारंपरिक पद्धतीने मुख्य परीक्षा 20, 21, 22 जानेवारी 2024 रोजी अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, नवी मुंबई व पुणे जिल्हा या केंद्रांवर घेण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0