रेशीम शेतीला प्रोत्साहन देण्यासाठी जिल्ह्यात महारेशीम अभियान

17 Nov 2023 19:16:30
तभा वृत्तसेवा
वर्धा,
Mahareshim Abhiyan : रेशीम शेतीचे शेतकर्‍यांना महत्त्व पटवून देण्यासोबतच जास्तीत जास्त शेतकर्‍यांना या शेतीकडे आकर्षित करण्यासाठी जिल्ह्यात 20 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे. अभियानादरम्यान शेतकर्‍यांनी रेशीम शेतीसाठी नाव नोंदणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
 
Mahareshim Abhiyan
 
रेशीम उद्योग हा कृषीवर आधारित रोजगाराची प्रचंड क्षमता असलेला उद्योग आहे. Mahareshim Abhiyan जिल्ह्यातील हवामान या उद्योगास पोषक असल्यामुळे रेशीम उत्पादन करण्यास भरपूर वाव तसेच ग्रामीण भागातील शेतकर्‍यांचा आर्थिकस्तर व जीवनमान उंचावण्यास मदत करणारा हा उद्योग आहे. शेतकर्‍यांना या उद्योगाची परिपूर्ण माहिती नसल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने या उद्योगाकडे वळलेले नाहीत. या पृष्ठभूमीवर व्यापक प्रमाणात जनजागृती आणि तुती लागवड करण्यासाठी शेतकर्‍यांची नोंदणी करणे या दुहेरी उद्देशाने महारेशीम अभियान राबविले जात आहे.
 
 
जिल्ह्याला रेशीम हब बनविण्याच्यादृष्टीने रेशीम विभागाचे प्रयत्न आहे. Mahareshim Abhiyan रेशीम उद्योग लोकाभिमुख होण्यासाठी यावर्षी सुद्धा अभियान आयोजित करण्यात आले आहे. अभियानात प्रशासकीय यंत्रणेसोबतच कृषी क्षेत्रात कार्यरत संस्था, रेशीम लागवडीतून अधिकाधिक उत्पन्न मिळवणार्‍या शेतकर्‍यांची मदत घेतली जात आहे. जिल्ह्यातील शेतकर्‍यांसाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत रेशीम उद्योग विकास योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत तुती लागवडीसाठी 1 लाख 86 हजार 186 रुपये तर कीटक संगोपनगृह बांधकामासाठी 1 लाख 79 हजार तसेच साहित्यासाठी 32 हजार असे तीन वर्षासाठी 3 लाख 97 हजार 335 रुपये अनुदान दिल्या जाणार आहे.
 
 
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तुती लागवड, जोपासना, संवर्धन व कीटक संगोपन करणे यासाठी 682 दिवस तसेच कीटक संगोपनगृह बांधकामासाठी 213 दिवस 273 रुपये मजुरी, अकुशलसाठी 2 लाख 44 हजार 335 रुपये तर कुशलसाठी 32 हजार, साहित्य व शेड बांधकामसाठी 1 लाख 21 हजार मिळणार आहे.
 
 
रेशीम संचालनालयाच्या वतीने केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-2 ही योजना राबविण्यात येत आहे. या Mahareshim Abhiyan योजनेतून तुती लागवड, कीटक संगोपनगृह बांधकाम, कीटक संगोपन साहित्य, तुती रोप वाटिका, बाल कीटक संगोपन केंद्र, रेशीम कोषापासेन धागा तयार करण्यासाठी मल्टिएंड रिलींग मशीनकरिता सर्वसाधारण वर्गासाठी 75 टक्के अनुदान आणि अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी 90 टक्के अनुदान देण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत रेशीम शेती म्हणजे काय, या शेतीचे महत्त्व, बाजारपेठेची उपलब्धता, रेशीम उद्योगाकरिता असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात येणार आहे.
Powered By Sangraha 9.0