सिंगापूर,
सिंगापूर आणि अमेरिकेतील आपल्या ग्राहकांसाठीYONO GLOBAL भारतीय स्टेट बँकेने (एसबीआय) बँकिंग मोबाईल अॅप ‘योनो ग्लोबल' YONO GLOBAL लाँच करणार आहे. याद्वारे ग्राहकांना डिजिटल सुविधा आणि इतर सेवा प्रदान करण्यात येतील. आम्ही योनो ग्लोबलमध्ये सर्वोत्तम उपलब्ध सेवा देण्यासाठी गुंतवणूक करीत आहोत. आम्हाला आमच्या ग्राहकांना चांगला अनुभव द्यायचा आहे, अशी माहिती बँकेच्या उपमहाव्यवस्थापक विद्या कृष्णन् यांनी दिली. सिंगापूर फिनटेक फेस्टिव्हलनिमित्त त्या बोलत होत्या.
YONO GLOBAL कृष्णन् यांनी सिंगापूरस्थित डिजिटल सेवा समर्थकांशी तसेच स्थानिक नियामक आणि सेंट्रल बँक, मॉनेटरी अथॉरिटी ऑफ सिंगापूर यांच्याशीही संवाद साधला. त्या म्हणाल्या, सिंगापूरमधील मोठ्या संख्येने भारतीय प्रवासी पाहता, आम्ही भारत आणि सिंगापूर येथे पैसे पाठवण्यावर सातत्याने काम करीत आहोत. एसबीआय सध्या नऊ देशांमध्ये ‘योनो ग्लोबल' सेवा पुरवत आहे. सप्टेंबर २०१९ मध्ये ब्रिटनमधून याची सुरुवात झाली. एसबीआयची परदेशातील उलाढाल सुमारे ७८ अब्ज डॉलर्स आहे.