शिल्पा शेट्टीचा 'सुखी' चित्रपटओटीटीवर प्रदर्शित

    दिनांक :17-Nov-2023
Total Views |
मुंबई,   
Sukhi released on OTT शिल्पा शेट्टी बॉलिवूडमधील सर्वोत्तम अभिनेत्रींपैकी एक आहे. 'सुखी' या चित्रपटातून ती  बऱ्याच काळानंतर मोठ्या पडद्यावर परतली . हा एक फॅमिली ड्रामा चित्रपट आहे, जो काही मोजक्याच लोकांना आवडले आहे. मोठ्या पडद्यानंतर आता हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवरही प्रदर्शित झाला आहे. 

Sukhi released on OTT
सोनल जोशी दिग्दर्शित हा चित्रपट 22 सप्टेंबर 2023 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने चित्रपटगृहात विशेष काही केले नाही. शिल्पा शेट्टीच्या 'सुखी' या चित्रपटाने चित्रपटगृहात काही खास कमाल केली नाही. सुमारे 15 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर जवळपास 2 कोटींचा व्यवसाय केला. Sukhi released on OTT आता या चित्रपटाने ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. शिल्पा शेट्टीची भूमिका असलेला हा चित्रपट आज नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाला आहे. अशा परिस्थितीत हा चित्रपट कोणी सिनेमागृहात पाहिला नसेल तर आता तुम्ही कुठेही बसून नेटफ्लिक्सवर पाहू शकता. या चित्रपटात गृहिणी बनून कुटुंबाच्या जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांची जीवनकहाणी दाखवण्यात आली आहे. या जबाबदाऱ्यांमध्ये ती स्वतःलाही विसरते.