मुंबई,
मराठा समाजाला सरसकट ओबीसी कोट्यातून आरक्षण आणि Kunbi कुणबी मराठा नोंदी मिळाव्यात, यासाठी राज्यभरात आंदोलन सुरू आहे. त्यातच राज्य सरकारने गेल्या १५ दिवसांत मराठा Kunbi कुणबी, कुणबी मराठा नोंदी तपासल्या. त्यात पूर्वीही ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत होता, त्यांचाही तपास करण्यात आला. गेल्या १५ दिवसांत २९ लाख एक हजार १२१ कुणबी मराठा नोंदी सापडल्या आहेत.
मराठवाड्यापासून कुणबी नोंदी तपासण्यास सुरुवात झाली. मात्र, मराठवाड्यात सर्वांत कमी नोंदी आढळून आल्या. सर्वाधिक नोंदी विदर्भात आढळल्या आहेत. मंत्रालयात आकडेवारी संकलनाचे काम सुरू आहे. पश्चिम महाराष्ट्रात सापडलेल्या बहुतेक नोंदी नव्या आहेत. आतापर्यंत सापडेल्या Kunbi नोंदींमध्ये विदर्भात सर्वाधिक तर, ज्या मराठवाड्यापासून नोंदी तपासण्यास सुरुवात झाली, तिथे सर्वांत कमी नोंदी आढळल्या. मराठवाड्याच्या सर्व जिल्ह्यांमध्ये मिळून ८ कोटी ९९ लाख ३३ हजार २८१ नोंदींपैकी कुणबी-मराठा जातीच्या २९ लाख एक हजार १२१ नोंदी सापडल्या आहेत. सर्वांत जास्त कुणबी नोंदी विदर्भामध्ये सापडल्या. विदर्भात हा आकडा १३ लाख ३ हजार ८८५ इतका आहे. कोकणात जवळपास साडेपाच लाख नोंदी तपासल्याानंतर ११८ कुणबी-मराठा नोंदी सापडल्या.
मागासवर्ग आयोगाने केवळ मराठा जातीचे सर्वेक्षण करावे : तायवाडे
Kunbi ओबीसी महासंघाचे अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मागासवर्ग आयोगाने नव्याने सर्वेक्षण करताना केवळ मराठा जातीचा अभ्यास करावा. ओबीसीत असलेल्या मराठा समुहातल्या सहा जातींचे सर्वेक्षण करू नये, असे ते म्हणाले.