कार्तिकी यात्रेसाठी दर्शनरांग उभारणीचे काम अंतिम टप्प्यात

प्रथमच १० विश्रांती कक्ष उभारणार

    दिनांक :18-Nov-2023
Total Views |
पंढरपूर, 
कार्तिकी सोहळ्यासाठी Kartiki Yatra येणाऱ्या १० ते १२ लाख भाविकांना देवाचे दर्शन घेता यावे, यासाठी मंदिर समितीने गोपाळपूर येथे १० पत्राशेड उभारले असून, Kartiki Yatra दर्शन रांग सात किलोमीटरपर्यंत उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. कार्तिकी सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांना दर्शन रांगेत ताटकळत उभे राहावे लागते. त्यांना रांगेत निवारा, पाणी, आरोग्य सुविधा, स्वच्छतागृहे उपलब्ध व्हावी, याबाबत जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिलेल्या सूचनेनुसार अद्ययावत अशी दर्शन रांग उभारणीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे.
 
 
Kartiki Yatra
 
कार्तिकी एकादशीच्या Kartiki Yatra पृष्ठभूमीवर गोपाळपूर येथे १० पत्राशेड उभारण्यात आले असून, यंदा दर्शन रांगेत १० ठिकाणी भाविकांसाठी विश्रांतीगृहे उभारण्याचे काम सुरू आहे. रांगेत दमलेल्या वृद्ध भाविकांना येथे रांगेतून येऊन विश्रांती घेता येणार असून, येथे त्यांना चहा-पाणी, वैद्यकीय उपचार याची व्यवस्था केली जाणार आहे. अशा भाविकांना विश्रांती कक्षात येताना टोकन देण्यात येणार असून, नंतर पुन्हा त्यांना त्यांच्या जागी दर्शन रांगेत जात येणार आहे. यंदा कार्तिकी यात्रा विक्रमी भरण्याचा अंदाज असून, त्यासाठी प्रशासनाने दर्शन व्यवस्थेवर भर देताना कोठेही घुसखोरी होऊ नये, याची विशेष काळजी घेतली आहे.
मंदिर २४ तास खुले ठेवण्याची परंपरा
यावर्षी कार्तिकी एकादशी Kartiki Yatra २३ नोव्हेंबर रोजी आहे. दर्शन रांगेत दोन खांबामधील अंतर जास्त असल्याने येथेही हजारो भाविक घुसखोरी करीत असल्याने हे अंतर कमी करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. आषाढी आणि कार्तिकी यात्रेसाठी राज्यभरातून लाखो भाविक पंढरपूरमध्ये येत असतात. यातील जास्तीत जास्त भाविकांना देवाच्या दर्शनाचा लाभ मिळावा, यासाठी मंदिर दर्शनासाठी २४ तास खुले ठेवण्याची परंपरा आहे. त्यानुसार देवाचा आणि रुक्मिणी मातेच्या शेजघरातील पलंग काढून ठेवण्यात येतो. यामुळे देवाची झोप बंद होते, अशी प्रथा आहे. यामुळे लाखो भाविकांना दिवसरात्र दर्शन घेता येणार आहे. कार्तिकी यात्रा संपल्यानंतर १ डिसेंबर रोजी विठूरायाची प्रक्षाळ पूजा होणार असून, या दिवसापासून पुन्हा देवाचे नित्योपचार सुरू होतील.