नवनाथ पुराण कथा सप्ताहाचे थाटात दिपप्रज्वलन

18 Nov 2023 20:14:07
साकोली, 
दरवर्षीप्रमाणे शिवशक्ती भागवत मंडळ बिरसा मुंडा चौक यांच्या वतीने येथील हनुमान मंदिराजवळ आयोजित Navnath Bhagwat Katha  श्री नवनाथ भागवत कथा सप्ताहाचे थाटात दिपप्रज्वलन करण्यात आले. 21 नोव्हेंबर 2023 पर्यंत चालणाऱ्या या कथा प्रवचनाचे कथाकार वृंदावन धाम श्री क्षेत्र पंढरपूर व श्री संत ज्ञानेश्वर महाराज आश्रम गर्रा बालाघाट येथील ह.भ.प.गुरूवर्य बांगरे महाराज आहेत.
 
 
Navnath Bhagwat Katha
 
Navnath Bhagwat Katha : दिपप्रज्वलन समयी ह.भ.प.बांगरे महाराज, माजी नगरसेवक रवी परशुरामकर, अ‍ॅड. मनिष कापगते, मोहन पाटणकर, केशव अतकरी, गिरीश इळपाते, संत डोमाजी कापगते, राजकुमार पोगडे, प्रदिप गोमासे, डॉ.अशोक कापगते, गिता बोरकर, मंडळाचे अध्यक्ष तुकाराम डोंगरवार, उपाध्यक्ष रतिराम डोंगरवार, सचिव गंगाराम कापगते, निताराम कापगते, होमराज कापगते, दामोधर शेंडे तसेच सर्व सदस्य व ग्रामस्थ महिला, पुरूष मंडळी उपस्थित होते.
Powered By Sangraha 9.0