- प्रकाश व्यवस्था करण्यासाठी निवेदन
साकोली,
येथील राष्ट्रीय महामार्गावरील लाखांदूररोड जवळील बोगद्यात रात्रीच्या वेळी आंधार राहत असल्याने प्रवाशांची अव्यवस्था होत होती. शिवाय असामाजिक तत्वांचा देखील या बोगद्यात धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या बोगद्यात प्रकाश व्यवस्थेची नितांत आवश्यकता असून याविषयीचे निवेदन माजी राज्यमंत्री Parinay Phuke परिणय फुके यांना साकोली येथील सुजान नागरिकांनी दिले.
याप्रसंगी माजी नगरसेवक रवी परशुरामकर, तालुका भाजपाध्यक्ष अमोल हलमारे, सदू कापगते, मनोहर भिवगडे, साकोली शहर सेवा दल अध्यक्ष ज्यांच्या नेतृत्वात प्रा.नितीन बावणकर, अनिल मुरकूटे उपस्थित होते. ही समस्या त्वरीत सोडविण्यात येईल, असे आश्वासन यावेळी Parinay Phuke फुके यांनी दिले.