आजचे राशीभविष्य दिनांक १८ नोव्हेंबर २०२३

    दिनांक :18-Nov-2023
Total Views |
 
Rashi
 
मेष (Aries Rashi )
प्रीती, लक्ष्मी योग कामाच्या ठिकाणी अडचणी दूर होतील. प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही बदल करावे लागणार आहेत.
वृषभ (Taurus )
कर्जातून मुक्त होण्यासाठी घरातील वरिष्ठ लोकांचा सल्ला घ्या. व्यवसायाची स्थिती मजबूत होईल. ऑफिसमध्ये चांगल्या कामगिरीमुळे तुम्हाला सरप्राईज मिळेल.
मिथुन (Gemini Rashi )
सणासुदीच्या काळात व्यवसायात काहीतरी नवीन करण्यात यश येईल. जोडीदाराच्या आरोग्याबाबत तुम्ही चिंतेत असाल.
 
कर्क (Cancer )
व्यवसायातील तुमच्या निष्काळजीपणाचा फटका बसणार आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात काही गैरसमज होण्याची शक्यता आहे.
 
सिंह (Leo Rashi )
व्यवसायात नफा मिळाल्याने तुमची चिंता कमी होईल. तुमच्या प्रेम आणि वैवाहिक जीवनाचा पुरेपूर आनंद घ्याल. विद्यार्थ्यांना ऑनलाइन काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे.
 
कन्या (Virgo )
अकडलेले पैसे परत मिळणार आहे. कामाचा ताण वाढणार आहे. कुटुंबासोबत काही आध्यात्मिक कार्यक्रमात सहभागी व्हाल.
 
तूळ (Libra Rashi )
तुमची आर्थिक स्थिती सुधारणार आहे. कुटुंबासोबत दिवस आनंदात जाणार आहे. वैवाहिक जीवनात समस्या दूर होईल.
 
वृश्चिक (Scorpio )
कामाच्या ठिकाणी विरोधक तुमच्या विरोधात कटकारस्थान रचणार आहे. ऑफिसमध्ये वाद होण्याची शक्यता. जोडीदारासोबतही मतभेद होण्याची शक्यता आहे.
 
धनु (Sagittarius Rashi )
तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे. शारीरिक त्रास सहन करावा लागू शकतो. सामाजिक आणि राजकीय स्तरावर तुमची प्रतिष्ठा वाढेल.
 
मकर (Capricorn )
तुमच्या मेहनतीचं फळ मिळणार आहे. सामाजिक आणि राजकीय स्तरावरील कामाला गती मिळणार आहे. मालमत्तेशी संबंधित प्रकरणं तुमच्या बाजूने लागणार आहे.
 
कुंभ (Aquarius Rashi )
कामाच्या ठिकाणीतील अडचणी दूर होणार आहे. मोठा वाद मिटवण्यात तुमची महत्त्वाची भूमिका असणार आहे.
 
मीन (Pisces )
व्यवसायातील नुकसानीची भरपाई न मिळाल्याने तुम्ही तणावात राहाल. त्वचेशी संबंधित काही समस्या उद्भवू शकते. कुटुंबातील घरगुती वादांपासून अंतर ठेवणं तुमच्या हिताचं ठरेल.