‘धूम’चा दिग्दर्शक संजय गढवींचे निधन

मॉर्निंग वॉकवेळी हृदयविकाराचा झटका

    दिनांक :19-Nov-2023
Total Views |
मुंबई, 
Sanjay Gadhvi passed away सुप्रसिद्ध दिग्दर्शक संजय गढवी यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. रविवारी सकाळी दहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. ते 57 वर्षांचे होते. संजय गढवी यांच्या निधनाने हिंदी सिनेजगतावर शोककळा पसरली आहे. ‘धूम’ आणि ‘धूम 2’ या सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे त्यांनी दिग्दर्शन केले होते.
 
 
Sanjay Gadhvi passed away
 
संजय गढवी हे सकाळी लोखंडवाला बॅकरोड येथे फिरायला जात असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले आणि ते घामाने भिजले. यानंतर संजय गढवी यांना तातडीने जवळच्या कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनानंतर अनेक बॉलिवूड कलाकार सोशल मीडियावर शोक व्यक्त करीत आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. Sanjay Gadhvi passed away संजय यांनी 2000 मध्ये ‘तेरे लिए’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. या चित्रपटाचे आधीचे नाव ‘तू ही बात’ असे होते, ज्यात अर्जुन रामपाल आणि रवीना टंडन यांनी मु‘य भूमिका साकारली होती. मात्र, कमी बजेटमुळे हा चित्रपट रखडला होता. संजयला 2004 मध्ये प्रसिद्धी मिळाली. त्यांनी धूम या अ‍ॅक्शन थि‘लर चित्रपटाचे दिग्दर्शन केले. संजय गढवी यांनी ‘धूम 2’, ‘मेरे यार की शादी है’ आणि इम‘ान खान स्टारर ‘किडनॅप’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही केले आहे. याशिवाय 2012 मध्ये त्यांनी ‘अजब गजब हा चित्रपट देखील दिग्दर्शित केला होता. ‘ऑपरेशन परिंदे’ या चित्रपटाचे दिग्दर्शनही त्यांनी केले. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता.