मुंबई,
मुंबईतील भाभा अणू संशोधन केंद्रातील raped (बीएआरसी) क्वार्टरमध्ये १९ वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीवर बलात्कार raped केल्याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. शीतपेयात अमली पदार्थ मिसळून पीडितेला ते प्यायला लावल्यानंतर आरोपींनी बलात्कार केला. पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. ही घटना चेंबूरच्या पोस्टल कॉलनीत बुधवार व गुरुवार दरम्यान घडली.
पीडित मुलगी तिच्या वडिलांना आवंटित केलेल्या क्वार्टरमध्ये राहते, जे बीएआरसी मध्ये कार्यरत आहेत. मुलीचे वडील कामाच्या जबाबदाऱ्यांमुळे इतरत्र राहतात. या प्रकरणातील एक २६ वर्षीय आरोपी देखील पीडितेच्या त्याच इमारतीत राहतो. कारण त्याचे वडील देखील बीएआरसीमध्ये काम करतात. आरोपी आणि पीडिता एकमेकांना ओळखत होते. आरोपीचे कुटुंबीय बाहेर कुठेतरी गेले असता त्यांनी बुधवारी रात्री त्याच्या एका मित्राला राहत्या घरी बोलावले. आरोपींना स्वयंपाक करण्यासाठी इंडक्शन कुकिंग सिस्टिमची गरज होती. त्याने पीडित युवतीला बोलावून इंडक्शन कुकिंग आणण्यास सांगितले. पीडित मुलगी आरोपीच्या घरी गेली, तिथे काही वेळ थांबून आरोपी आणि त्याच्या मित्राशी बोलली. नंतर आरोपीने तिला अमली पदार्थ मिसळलेले शीतपेय दिले. पीडित युवतीने शीतपेय घेतल्यानंतर ती बेशुद्ध पडली. ही संधी साधून आरोपी आणि त्याच्या मित्राने विद्यार्थिनीवर बलात्कार raped केल्याचे पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. पोलिसांनी २६ आणि ३० वयोगटातील दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्यावर संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.